डोनाल्ड ट्रम्पना “गुंडाळून” व्लादिमीर पुतिन अलास्का मधून पुन्हा मॉस्कोत; युद्ध थांबवायची जबाबदारी झेलेन्सकीवर!!

Vladimir Putin

डोनाल्ड ट्रम्पला “गुंडाळून” व्लादिमीर पुतिन अलास्का मधून पुन्हा मॉस्कोत; युद्ध थांबवायची जबाबदारी झेलेन्सकीवर!!, ही अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यातल्या बहुचर्चित अलास्का वाटाघाटींची फलश्रुती ठरली. दोन्ही नेते अलास्का मध्ये साधारण सहा तास भेटले. त्यातल्या तीन तास द्विपक्षीय वाटाघाटी केल्या. परंतु, रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबविण्यासंदर्भात दोघांमध्ये कुठलाही करार झाला नाही. युद्ध थांबविण्यासंदर्भात चर्चेतून “प्रगती” झाली. आम्ही पुढचे पाऊल टाकले, एवढेच दोघांनी एकमेकांना आणि नंतर पत्रकारांना सांगितले. युद्ध थांबविण्यासंदर्भात पुतिन यांनी ट्रम्प यांना कुठलाही “शब्द” दिला नाही. उलट युरोपने युक्रेन मध्ये लुडबुड करणे थांबवावे, असे त्यांनी ट्रम्प यांच्या समोर सुनावून घेतले.Vladimir Putin “wraps up” Donald Trump, returns to Moscow from Alaska

डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांच्यातल्या द्विपक्षीय चर्चेची फार मोठी चर्चा अमेरिकन आणि जागतिक माध्यमांनी घडवली. त्यांच्या भेटीचा प्रत्येक क्षण माध्यमांनी “लाईव्ह” टिपला. दोघांमध्ये नेमकी काय चर्चा होईल??, त्या चर्चेचा भारत + चीन + रशिया आणि अमेरिका यांच्यावर काय परिणाम होईल??, रशिया आणि युक्रेन यांच्यातले युद्ध थांबल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार मिळेल का??, डोनाल्ड ट्रम्प पुढचे टेरिफ युद्ध थांबवतील का??, या सवालांवर देखील सर्व माध्यमांनी चर्चेची भरमार केली.



मात्र, ट्रम्प आणि पुतीन यांच्यात त्या द्विपक्षीय चर्चेतून या सगळ्या प्रश्नांना कुठलीही ठाम उत्तरे मिळाली नाहीत. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबविण्यासाठी “पुढचे पाऊल” टाकण्या पलीकडे द्विपक्षीय चर्चेतून हाती काही लागले नाही. पण या चर्चेतून डोनाल्ड ट्रम्प “समाधानी” दिसले. कारण तसे त्यांनी पत्रकार परिषदेत स्वतःहून सांगितले. रशिया आणि युक्रेन यांच्यातले युद्ध थांबविणे आता प्रेम चे अध्यक्ष झेलेन्सकी यांच्या हातात आहे. त्यांनी लवकरच पुतिन यांच्याबरोबर चर्चा करावी. त्या चर्चेत मी देखील असेल असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

पुढची चर्चा मॉस्कोमध्ये व्हावी अशी सूचना पुतिन यांनी केली. ती ट्रम्प यांनी लगेच मान्य केली नाही. अनेक लोकांना हे फार आवडणार नाही, पण पण मास्को मध्ये जाऊन अशी चर्चा होणारच नाही असे मी म्हणणार नाही, असे ट्रम्प म्हणाले.

– ट्रम्प अध्यक्ष असते तर युद्ध झाले नसते

पुतिन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना “थोडा गुळ” लावला. 2022 मध्ये डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष असते, तर रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध सुरू झाले नसते, असे ट्रम्प म्हणाले होते. ट्रम्प यांच्या म्हणण्याला पुतिन यांनी पत्रकार परिषदेत दुजोरा दिला. तेवढेच वाक्य ते मुद्दाम इंग्लिश मध्ये म्हणाले. त्यांनी अप्रत्यक्षपणे अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन आणि युरोपियन युनियन यांना रशिया आणि युक्रेन यांच्या मधल्या युद्धासाठी जबाबदार धरले. युरोपने युक्रेन मध्ये लुडबुड करणे थांबवावे असे ट्रम्प यांच्या समोर सुनावले.

– ट्रम्प पेक्षा पुतिनचा लाभ

डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर वाटाघाटी करून पुतिन यांनी रशियासाठी बरेच काही मिळवले. पुतिन यांनी रशियाचे diplomatic isolation संपविले. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या बरोबरीचे स्थान मिळवले. त्याचवेळी पुतिन यांना रशिया आणि यांच्यातले युद्ध थांबविण्याचा “शब्द” द्यावा लागला नाही. रशियावरचे अमेरिकन निर्बंध सहन करावे लागले नाहीत. डोनाल्ड ट्रम्प यांना रशियावर निर्बंध लावता येणार नाहीत याची “व्यवस्था” केली.

– भारतावरचे टेरिफ टळले

त्याचा भारत आणि चीन यांच्यावर सकारात्मक परिणाम झाला. भारतावर टेरिफ लावायचा का नाही??, हा विषय आता चर्चेचा नाही. त्यावर दोन-तीन आठवड्यानंतर चर्चा पुन्हा सुरू होऊ शकते, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. याचा अर्थ भारतावरचे टेरिफ किमान पुढचे दोन तीन आठवडे टळले.

या द्विपक्षीय वाटाघाटींमधून डोनाल्ड ट्रम्प यांच्या हाती ठोस काही लागले नाही, असा निष्कर्ष अमेरिकन माध्यमांनी काढला कारण मूळातच त्यांनी या द्विपक्षीय वाटाघाटींचे “तापमान” स्वतःहून खूप वाढवून ठेवले होते. डोनाल्ड ट्रम्प हे व्लादीमिर पुतिन यांना झुकवतील अशी वातावरण निर्मिती स्वतःहूनच माध्यमांनी तयार केली होती, जी पूर्णपणे फसली. त्या उलट अलास्कात डोनाल्ड ट्रम्प यांना “गुंडाळून” पुतिन मॉस्कोला निघून गेले.

Vladimir Putin “wraps up” Donald Trump, returns to Moscow from Alaska; Zelenskyy’s responsibility to stop the war!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात