वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : आंतरराष्ट्रीय संबंधांबाबत अमेरिकेची दुटप्पी भूमिका पुन्हा एकदा समोर आली आहे. एकीकडे अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या नागरिकांना पाकिस्तान भेटी संदर्भात सावधानतेची सूचना दिली आहे, तर दुसरीकडे पाकिस्तानातल्या आपल्या राजदूताला पाकव्याप्त भेटीच्या काश्मीरवर पाठवले आहे. बायडेन प्रशासनाची ही दुटप्पी भूमिका आता जगासमोर आली आहे. US’s double role: Citizens advised to avoid visiting Pakistan
अमेरिकी नागरिकांना सल्ला
पाकिस्तानात सध्या अस्थिर वातावरण आहे. तेथे केव्हाही दहशतवादी हल्ले होऊ शकतात. सबब अमेरिकी नागरिकांनी शक्यतो पाकिस्तानात प्रवास करणे टाळावे. विशेषतः बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनवा प्रांतांमध्ये प्रवास करू नये, अशा सूचना अमेरिके परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या नागरिकांसाठी जारी केल्या आहेत.
मात्र त्याच वेळी अमेरिकेचे पाकिस्तान मधील राजदूत डोनाल्ड ब्लोम यांनी पाकिस्तान व्याप्त काश्मीरला भेट दिली आहे. पाकव्याप्त काश्मीरची कथित राजधानी मुजफ्फराबाद येथे तेथे त्यांनी अमेरिका – पाकिस्तान द्विपक्षीय संबंधांच्या 75 वर्षानिमित्त एक पार्टी आयोजित केली आणि त्यात 950 अमेरिकी – पाकिस्तानी नागरिकांना मेजवानी दिली.
अमेरिकी नागरिकांसाठी एक न्याय, तर आपल्याच प्रशासनाच्या राजदूतासाठी दुसरा न्याय ही बायडेन प्रशासनाची दुटप्पी राजनीती या निमित्ताने समोर आली आहे. अमेरिकेतील पाकिस्तानातील अमेरिकी राजदूताने मुजफ्फराबादला भेट देऊन “आझाद काश्मीर” असे त्या भागाला संबोधणे, याचा भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र शब्दात निषेध केला आहे. भारताच्या या तीव्र भावना अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाला कळविल्या आहेत, अशी माहिती परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App