कोरोनाच्या लढ्यात आशेचा किरण, लहान मुलांवरील लशींच्या चाचण्या अमेरिकेत सुरू

विशेष प्रतिनिधी

न्यूयॉर्क : अमेरिकेत गेल्या महिन्यातच १२ ते १५ वयोगटासाठी फायजर-बायोएनटेक लशीला मान्यता दिली होती. फायजरच्या लशीला सुरवातीच्या काळात १६ आणि त्यापेक्षा अधिक वयोगटातील लोकांना लस देण्याची परवानगी दिली होती.USA started vaccine testing for children

आता फायजरने १२ पेक्षा कमी वयोगटातील मुलांवर चाचणी करण्याचे ठरवले आहे. यासाठी हजारो मुले तयार झाली आहेत.फायजर कंपनीने १२ पेक्षा कमी वयोगटातील मुलांची कोरोना प्रतिबंधक लशीची चाचणी सुरू केली आहे.



चाचणीसाठी अमेरिकेतील ९० राज्यातील ४५०० स्वयंसेवक तयार असल्याचे फायजर कंपनीने म्हटले आहे. ही चाचणी अमेरिकेबरोबरच फिनलँड, पोलँड, स्पेनमध्येही केली जाणार आहे. प्रारंभीच्या काळात स्वयंसेवकांना कमी प्रमाणात डोस दिला जाणार आहे.

या आठवड्यात ५ ते ११ वयोगटातील मुलांचे लसीकरण केले जाणार आहे. यात मुलांना प्रत्येकी दहा मायक्रोग्रॅमचे दोन डोस दिले जाणार आहेत. यानंतर सहा महिन्यांच्या बाळांचे लसीकरण काही आठवड्यानंतर सुरू होईल आणि त्यांना तीन मायक्रोग्रॅमची डोस दिली जाईल.

USA started vaccine testing for children

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात