कोरोनाच्या संसगार्मुळे भारत उद्धवस्त झाला आहे. जगभरात करोनाचा संसर्ग फैलावल्याबद्दल चीनने भारतासह जगाला नुकसानभरपाई देण्याची मागणी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे.US President Donald Trump has demanded that China compensate the world, including India, for the corona outbreak.
विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन: कोरोनाच्या संसगार्मुळे भारत उद्धवस्त झाला आहे. जगभरात करोनाचा संसर्ग फैलावल्याबद्दल चीनने भारतासह जगाला नुकसानभरपाई देण्याची मागणी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे.
फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी चीनने अमेरिकेला नुकसानभरपाई म्हणून १० ट्रिलियन अमेरिकन डॉलर देण्याची मागणी केली. यांनी ही मागणी केली. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, जगातील बरेच देश करोनाच्या संसगार्मुळे उद्धवस्त झाले आहेत.
अमेरिकेचेही मोठे नुकसान झाले आहे. करोनाचा विषाणू हा चिनी विषाणू असल्याचे त्यांनी म्हटले.ट्रम्प म्हणाले, विषाणूची गळती होणे हा अपघात झाला असला तरी अनेक देशांवर वाईट परिणाम झाले आहेत. याआधी असे कधीच घडले नव्हते. भारतातही करोनाचे थैमान सुरू आहे.
आम्ही चांगले काम करत आहोत हे दाखवण्याची भारतीयांची सवय आहे. मात्र, सत्य परिस्थिती वेगळी आहे. भारत करोना महासाथीमुळे उद्धवस्त झाला आहे. जगातील जवळपास सर्वच देशांची ही परिस्थिती आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App