वृत्तसंस्था
टोकियो : पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-7 बैठकीत सहभागी होण्यासाठी जपानमध्ये आहेत. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्याशी चर्चा केली. यावेळी बायडेन म्हणाले की, मी पंतप्रधान मोदींचा ऑटोग्राफ घ्यायला हवा.US President Biden met Modi in Japan, said – I should get your autograph!
वास्तविक, बैठकीदरम्यान बायडेन मोदींकडे आले आणि ते म्हणाले – अमेरिकेतील खूप मोठे लोक म्हणत आहेत की तुम्ही मोदींच्या कार्यक्रमाला जा. यादरम्यान अल्बानीज यांनी सांगितले की त्यांनाही अशा प्रकारच्या विनंत्या येत आहेत, परंतु सिडनीच्या कम्युनिटी रिसेप्शनची क्षमता फक्त 20,000 लोकांची आहे. बायडेन आणि अल्बानीज यांनी मोदींना सांगितले की, त्यांच्यासमोर गर्दीचे व्यवस्थापन करण्याचे आव्हान आहे. यादरम्यान अल्बानीज यांनी सांगितले की, ते भारत दौऱ्यावर असताना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 90,000 लोकांनी त्यांचे आणि मोदींचे कसे स्वागत केले. यावर बायडेन म्हणाले – मी तुमचा ऑटोग्राफ घ्यायला हवा.
मोदींनी शांतता स्मारकाला भेट देऊन वाहिली आदरांजली
नरेंद्र मोदी यांनी रविवारी पीस मेमोरियल पार्कला भेट दिली. येथे त्यांनी पीस मेमोरियल म्युझियमला भेट दिली आणि हिरोशिमा दुर्घटनेत प्राण गमावलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली. हिरोशिमा हे शहर अणुहल्ल्याचे साक्षीदार आहे. 6 ऑगस्ट 1945 रोजी अमेरिकेने हिरोशिमावर अणुबॉम्ब टाकला होता. यामध्ये लाखो लोक मारले गेले होते.
त्यानंतर मोदींनी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली. काल म्हणजेच 20 मे रोजी दोन्ही पंतप्रधानांनी एकमेकांना मिठी मारून स्वागत केले. सुनक हे ब्रिटनचे पहिले भारतीय वंशाचे आणि गोरे नसलेले पंतप्रधान आहेत. ते भारतीय सॉफ्टवेअर कंपनी इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावईदेखील आहेत.
भारतीय वेळेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 10:15 वाजता हिरोशिमाहून पापुआ न्यू गिनीसाठी रवाना होतील.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App