वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : अमेरिकेने पुन्हा एकदा युक्रेनला मदतीचा हात पुढे केला आहे. युद्धासाठी बायडेन प्रशासनाने 400 मिलियन डॉलरची लष्करी मदत जाहीर केली आहे. नवीन लष्करी मदत पॅकेजमध्ये रणगाडे आणि चिलखती वाहनांची वाहतूक करण्यासाठी आवश्यक असलेल्या तात्पुरत्या पुलांसह दारूगोळा समाविष्ट आहे.US announces $400 million in military aid to Ukraine; Blinken’s criticism of Russia
यापूर्वी 20 फेब्रुवारीला रशिया आणि युक्रेनमधील युद्धाला एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी कीव्हमध्ये पोहोचून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. त्यांनी युक्रेन गाठले आणि राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतली. 24 फेब्रुवारी 2022 रोजी रशियाने युक्रेनवर हल्ला केला. त्यानंतर पहिल्यांदाच अमेरिकन राष्ट्राध्यक्ष युक्रेनमध्ये पोहोचले होते. दरम्यान, ही बैठक-चर्चा आपल्याला विजयाच्या जवळ घेऊन जाईल, असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी म्हटले होते.
बायडेन यांच्या दौऱ्यापूर्वी अमेरिका सध्या दुरूनच युक्रेनला लष्करी मदत करत होती. जो बायडेन यांनी अनेक प्रसंगी युक्रेनच्या पाठीशी उभे राहण्याची घोषणा केली आहे. यानंतर युक्रेनमध्ये पोहोचल्यानंतर बायडेन यांनी युद्धग्रस्त देशाला आणखी मदत देण्याची घोषणा केली होती. युक्रेनला अधिकाधिक नवनवीन शस्त्रे पुरवणार असल्याचे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी सांगितले होते. युक्रेनच्या संरक्षणासाठी हवाई पाळत ठेवणारे रडार देण्याची घोषणा त्यांनी केली.
ब्लिंकेन यांनीही रशियाला वेढले
दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन म्हणाले की, रशियाला युक्रेनवर हल्ला करण्याची परवानगी मिळाल्यास संभाव्य आक्रमकांनाही अशीच मोकळीक मिळेल. भारत, जपान आणि ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या उपस्थितीत ‘रायसीना डायलॉग’ या सत्रात झालेल्या चर्चेदरम्यान ब्लिंकेन यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, “रशिया युक्रेनमध्ये जे काही करत आहे ते बिनदिक्कतपणे चालू ठेवल्यास ते संभाव्य आक्रमकांना संदेश देईल की तेही असे करू शकतात.”
लॅव्हरोव्ह यांच्या भेटीनंतर आली प्रतिक्रिया
ब्लिंकेन यांचे हे वक्तव्य त्यांनी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लॅव्हरोव्ह यांच्याशी दिल्लीत झालेल्या एका संक्षिप्त भेटीनंतर केले आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर दोन्ही परराष्ट्र मंत्र्यांची ही पहिलीच आमने-सामने बैठक होती.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App