अमेरिकेचे राजदूत गार्सेटी यांनी केले कौतुक (US Ambassador Garcetti )
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी यांनी पुन्हा एकदा भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांवर भाष्य केले. ते म्हणाले की ‘सर्वात तीव्र वादळ’ आणि ‘सर्वात जोरदार वारा’ असूनही वाढणाऱ्या पाम वृक्षाच्या लवचिकतेप्रमाणे भारत-अमेरिका संबंध वाढतच जातील आणि जगाला फायदा होईल. (US Ambassador Garcetti )
एका कार्यक्रमात बोलताना राजदूतांनी विशेषत: अक्षय ऊर्जेसाठी भारताच्या धाडसी लक्ष्यांची प्रशंसा केली. ते म्हणाले की, येत्या 30 वर्षांत भारत ही अक्षय ऊर्जा क्षेत्रात जागतिक स्तरावर सर्वात मोठी बाजारपेठ असेल. ते म्हणाले, ‘भारताची महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे आणि धोरणे सौर आणि पवन ऊर्जा क्षमतांमध्ये अग्रेसर बनत आहेत. आम्हाला केवळ या देशासाठीच नव्हे तर जगासाठी उत्पादन करण्यास सक्षम बनणे आहे.
Maharashtra cabinet expansion : पहिल्याच झटक्यात 39 मंत्र्यांसह फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार; नव्यांच्या समावेशाने मंत्रिमंडळाचा चेहरा मोहरा बदलला!!
ते म्हणाले, ‘माझा शब्द आहे की येत्या 30 वर्षांत भारत अक्षय ऊर्जा क्षेत्रात जागतिक स्तरावर सर्वात मोठी बाजारपेठ असेल.’ राजदूत गार्सेटी यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम (USISPF) द्वारे आयोजित ‘साऊथ एशिया वुमन इन एनर्जी लीडरशिप’ शिखर परिषदेला संबोधित करत होते. त्यांनी केरळमधील एका हॉटेलच्या मुक्कामाच्या शेवटी नारळाचे झाड लावण्याची विनंती केल्याची घटना कथन केली. ते म्हणाला, ‘मी म्हणालो या झाडावरून नारळ यायला किती वेळ लागेल. यावर त्यांनी तब्बल आठ वर्षांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App