विशेष प्रतिनिधी
लंडन : ब्रिटनमध्ये आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. निर्बंध शिथिल केल्यानंतर ब्रिटनमध्ये फ्रीडम डे साजरा केला जात असताना पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.Unlock process begins in Briton
ब्रिटनने चार टप्प्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू केली आहे. हा चौथा टप्पा असून काही अटींवर मास्क घालण्याबाबतचे निर्बंधही शिथिल केले आहेत. ब्रिटनमध्ये २३ मार्चपासून लॉकडाउन लागू आहे.
पंतप्रधान जॉन्सन यांनी नागरिकांना लस घेण्याचे आवाहन केले आहे. कारण लसीकरणामुळे दवाखान्यात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. विरोधकांनी मात्र अनलॉक प्रक्रियेला आक्षेप घेतला आहे.
बोरिस जॉन्सन यांनी म्हटले की, आपण आजपासून सर्वकाही सुरू करत आहोत आणि हा निर्णय बरोबर आहे. जर आपण आताच सुरवात केली नाही तर शरद ऋतू आणि हिवाळ्याच्या महिन्यात सुरवात केली तर कोरोना संसर्ग हा थंड वातावरणाचा फायदा घेऊ शकतो. संसर्ग अजूनही वातावरणात आहे आणि रुग्णांची संख्या वाढत आहे, हे आपल्याला लक्षात घ्यावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App