वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : जेव्हापासून एलन मस्क यांनी ट्विटर विकत घेतले, तेव्हापासून अनेक बदलांमुळे सर्वांना चकित केले आहे. अलीकडेच त्यांनी ट्विटरचा लोगो बदलून कुत्र्याला लावले. त्याचवेळी ट्विटरचे एक्स कॉर्प नावाच्या कंपनीत विलीनीकरण झाल्याची बातमी आहे. ही गोष्ट कितपत खरी आहे, यासाठी एलन मस्क यांच्या अधिकृत वक्तव्याची वाट पाहावी लागेल, परंतु एलन मस्क यांनी मंगळवारी एक ट्विट केले ज्यामध्ये त्यांनी फक्त ‘एक्स’ लिहिले. यानंतर चर्चा सुरू झाली आहे.Twitter likely to merge with X Corp, Elon Musk’s suggestive tweet, blue tick to be removed on April 20
ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी यांच्याशी संबंधित एका प्रकरणात 4 एप्रिल रोजी कायदेशीर कागदपत्रांद्वारे स्पष्ट झाले की, ट्विटरचे अस्तित्व नाहीसे झाले आहे आणि X कॉर्प नावाच्या संस्थेमध्ये ही कंपनी विलीन करण्यात आली आहे.” परंतु युझर्स X कॉर्प काय आहे याबद्दल गोंधळलेले आहेत, तर ट्विटरचे सीईओ एलन मस्क यांनी यासंबंधी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
X — Elon Musk (@elonmusk) April 11, 2023
X
— Elon Musk (@elonmusk) April 11, 2023
एलन मस्क यांची कंपनी आहे एक्स कॉर्प!
मीडिया रिपोर्ट्सनुसार, एक्स कॉर्प ही कंपनी स्वतः एलन मस्क यांच्या मालकीची आहे. कंपनीचा मुख्य व्यवसाय सॅन फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया येथे आहे. यात एलन मस्क यांनी ट्विटरचे विलिनीकरण केले आहे. यामुळेच मस्क यांचे ‘X’ शब्द असलेले ट्विट हे याचेच सूचक असल्याचे मानले जात आहे.
Final date for removing legacy Blue checks is 4/20 — Elon Musk (@elonmusk) April 11, 2023
Final date for removing legacy Blue checks is 4/20
20 एप्रिलला हटणार ब्लू टिक
ट्विटरवरील व्हेरिफाईड अकाऊंटवरील ब्लू टिक आता लोकांच्या प्रोफाइलवर दिसणार नाही. खुद्द एलन मस्क यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी सत्यापित ट्विटर खात्यांसाठी ब्लू टिक्सची मर्यादा निश्चित केली आहे. त्यांनी ट्विटरवर सांगितले की, ब्लू टिक्स काढण्याची शेवटची तारीख 4/20 आहे. याचा अर्थ असा की जर तुमचे ट्विटरवर ब्लू टिक असलेले सत्यापित खाते असेल तर तुम्हाला त्यासाठी पैसे द्यावे लागतील. यानंतर, जे लोक ट्विटर ब्लूचे सदस्य असतील त्यांच्याकडेच ब्लू टिक असेल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App