विशेष प्रतिनिधी
इस्तंबूल : काबूल विमानतळाचा ताबा अमेरिकेने सोडल्यावर तुर्कस्तानने तो ताब्यात घेऊन कामकाज चालवावे, अशी इच्छा तालिबानने जाहीरपणे व्यक्त केली आहे. तुर्कस्तानने याबाबत अद्याप निर्णय घेतला नसल्याचे या देशाचे अध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगान यांनी सांगितले.Turki must take control of airport – Taliban
अफगाणिस्तानमध्ये प्रशासन सुरु झाल्यावर याबाबत विचार करू, असेही त्यांनी स्पष्ट केले. काबूलमधील तुर्कस्तानच्या दूतावासात तालिबानी नेते आणि तुर्कस्तानच्या अधिकाऱ्यांमध्ये सुमारे तीन तास चर्चा झाली. गरज पडल्यास आणखी एकदा चर्चा करू, असे एर्दोगान यांनी सांगितले.
दरम्यान काबूल विमानतळावर दहशतवाद्यांकडून आणखी हल्ले होण्याची शक्यता असल्याचा इशारा अमेरिकेच्या सुटका मोहिमेचे प्रमुख जनरल फ्रँक मॅकेन्झी यांनी दिला आहे. कालचा हल्ला तालिबानच्या मदतीने घडवून आणण्यात आल्याच्या वृत्ताचा त्यांनी इन्कार केला. हल्ल्यात तालिबानचा सहभाग असल्याचे कोणतेही पुरावे नाहीत, उलट त्यांना विमानतळाबाहेरील सुरक्षा वाढविण्यास सांगितले आहे, असे मॅकेन्झी यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App