तुर्कस्तान-सीरियात पुन्हा भूकंप : 6.4 तीव्रता, इस्रायलपर्यंत जाणवले धक्के, 3 ठार, 213 जखमी


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : तुर्कस्तान आणि सीरियामध्ये 14 दिवसांनंतर सोमवारी रात्री 8.04 वाजता पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 6.4 इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून 2 किलोमीटर खोल होता. त्यानंतर आलेल्या धक्क्यांची तीव्रता 3.4 ते 5.8 इतकी होती. त्यामुळे 3 जणांचा मृत्यू झाला असून 213 जण जखमी झाले आहेत.Turkey-Syria Earthquake Again Magnitude 6.4, Tremors Felt As Far As Israel, 3 Killed, 213 Injured

तुर्की-सीरिया सीमा भागात 68 तासांत 11 भूकंप

तुर्कस्तानच्या अनादोलू वृत्तसंस्थेच्या सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन ठिकाणी शोध आणि बचावाचे प्रयत्न सुरू आहेत. सोमवारच्या भूकंपाचे धक्के लेबनॉन, इस्रायल आणि सायप्रसमध्येही जाणवले. युरोपीयन भूमध्य भूकंप विज्ञान केंद्राच्या मते, पुढील धक्क्यांना सामोरे जावे लागू शकते.



मृतांचा आकडा 47 हजारांवर

6 फेब्रुवारी रोजी झालेल्या तीन मोठ्या भूकंपांमुळे तुर्की आणि सीरियामध्ये मृतांची संख्या 47 हजारांच्या पुढे गेली आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, दोन्ही देशांतील 2.6 कोटी लोकांना मदतीची गरज आहे. गेल्या 75 वर्षांत पहिल्यांदाच डब्ल्यूएचओ एवढ्या मोठ्या प्रमाणावर बचाव मोहीम राबवत आहे.

ढिगाऱ्यावर फुगे बांधून श्रद्धांजली

तुर्कस्तानमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांनी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या बालकांवर ढिगाऱ्यांवर लाल फुगे बांधून श्रद्धांजली वाहिली. प्रकल्पाचे प्रमुख ओगवेन सीवर ओकूर यांनी सांगितले की, त्यांनी ढिगाऱ्यात विविध ठिकाणी 1000-1500 फुगे बांधले आहेत. प्रत्येक फुगा भूकंपात प्राण गमावलेल्या मुलांची आठवण आहे. या प्रकल्पांतर्गत आणखी फुगे लावण्यात येणार आहेत.

तुर्कस्तानमध्ये बचावकार्य जवळपास संपले

तुर्की सरकारने कहरामनमारस आणि हाताय वगळता सर्व राज्यांमधील बचाव कार्य संपवले आहे. ‘ऑपरेशन दोस्त’ अंतर्गत भारतातून तुर्कीला गेलेली एनडीआरएफची टीमही परत आली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सांगितले की, सरकारने सीरिया आणि तुर्कीमध्ये मोठ्या प्रमाणात मदत सामग्री पाठवली आहे. जगाच्या मदतीसाठी भारत सदैव तत्पर आहे.

आतापर्यंत….

तुर्कीमध्ये 41,000 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सीरियामध्ये 5,800 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
NATO ने तुर्कीला 600 तात्पुरते कंटेनर घरी पाठवले आहेत, जे पुढील आठवड्यापर्यंत तेथे पोहोचतील.
तुर्कस्तान-सीरियात ढिगार्‍याखाली दबलेल्यांचा शोध घेण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. यानंतर केवळ मृतदेहच सापडतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Turkey-Syria Earthquake Again Magnitude 6.4, Tremors Felt As Far As Israel, 3 Killed, 213 Injured

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात