Trump : नाटो देशांनी चीनवर 50-100% कर लादावा; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची नवीन धमकी

Trump

वृत्तसंस्था

वॉशिंग्टन डीसी : Trump जगभरात कर युद्ध सुरू करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी नवीन चाल सुरू केली आहे. आतापर्यंत युक्रेन युद्ध थांबवण्यात अपयशी ठरलेले ट्रम्प म्हणाले की, नाटो देशांनी संघर्ष संपवण्यासाठी मदत म्हणून चीनवर ५० ते १००% कर लादावेत. ट्रम्प म्हणाले, असे झाल्यास रशिया-युक्रेन युद्ध संपेल.Trump

एक दिवस आधी अमेरिकेने जी-७ देशांना रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर कर लादण्याचे आवाहन केले होते. ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर लिहिले, सर्व नाटो देशांनी यावर सहमती दर्शविली तर मी रशियावर मोठे निर्बंध लादण्यास तयार आहे. ट्रम्प म्हणाले, विजयासाठी नाटोची कटीबद्धता १००% पेक्षा खूपच कमी आहे. काही देशांकडून रशियन तेल खरेदी करणे धक्कादायक आहे. ते म्हणाले, यामुळे रशियासोबतची तुमची वाटाघाटीची स्थिती आणि सौदेबाजीची शक्ती खूपच कमकुवत होते. ते म्हणाले, चीनची रशियावर मजबूत पकड आहे. आपण असा टेरिफ लादला तर त्यांची पकड कमकुवत होईल.Trump



नाटोमध्ये ३२ देश, टेरिफ लादल्यास मोठ्या पुरवठा साखळीला फटका बसण्याची भीती

उत्तर अटलांटिक करार संघटना (नाटो) १९४९ मध्ये स्थापन झाली. त्यात अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन, तुर्किये, इटली, स्पेन, पोलंडसह ३२ देश आहेत. या सर्व देशांची लोकसंख्या एक अब्ज आहे. ती जगाच्या एकूण लोकसंख्येच्या १२.३% आहे (सुमारे ८.१ अब्ज). या देशांचा एकूण जीडीपी सुमारे ५० हजार अब्ज डाॅलर्स आहे. ती जगाच्या एकूण जीडीपीच्या सुमारे ४७.६% आहे (सुमारे १,०५,००० अब्ज डाॅलर्स).

चीन व भारतानंतर २०२४ च्या पहिल्या सहामाहीत तुर्किये रशियन कच्च्या तेलाचा तिसरा सर्वात मोठा खरेदीदार बनला. ताे युक्रेन युद्धापूर्वी १४ व्या क्रमांकावर होता. तुर्किये हा नाटोचा सदस्य देश आहे. हंगेरी, स्लोव्हाकियासारखे नाटो देशदेखील रशियन तेल खरेदी करत आहेत.

मी राष्ट्राध्यक्ष असतो तर हे युद्ध सुरू झाले नसते

ट्रम्प यांनी युक्रेन आणि रशियामधील युद्धाला बायडेन आणि झेलेन्स्की यांच्यातील युद्ध म्हटले. ते म्हणाले, मी राष्ट्राध्यक्ष असतो तर हा संघर्ष झाला नसता. मी हजारो लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. नाटोने माझ्या म्हणण्यानुसार काम केल्यास युद्ध संपेल. अमेरिकेने चीनमधून होणाऱ्या आयातीवर ३०% कर लादला आहे, तर चीनने अमेरिकेवर १०% कर लादला आहे.

Trump Threatens NATO Countries China Tariffs

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात