विशेष प्रतिनिधी
किव्ह : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेन आणि रशियाच्या अध्यक्षांशी स्वत: संपर्क साधून भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित सीमा ओलांडू देण्याचे आवाहन केले. त्यामुळे चेकपॉर्इंटवर ते सुरक्षित राहिले. केवळ भारतीय विद्यार्थीच नव्हे तर पाकिस्तानी आणि तुर्की विद्यार्थ्यांनीही तिरंगा फडकाविला. त्यामुळे त्यांनाही सुरक्षितपणे सीमा ओलांडणे शक्य झाले.Tricolor support for Pakistani, Turkish students, flying tricolor across Ukraine
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय तिरंग्याचा वापर अगदी पाकिस्तानी आणि तुर्की विद्यार्थ्यांनीही केला. युक्रेनमधून रोमानियामध्ये आलेल्या एका भारतीय विद्याथ्यार्ने सांगितले की, भारतीय तिरंगा केवळ भारतीयांसाठीच नाही तर पाकिस्तानी आणि तुर्की विद्यार्थ्यांसाठीही आधार बनला.
एका विद्यार्थ्याने सांगितले की, त्यांना युक्रेनची सीमा ओलांडताना भारतीय ध्वज सोबत ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आम्ही तिरंगा फडकावित आलो तर सीमेवर किंवा युक्रेनमध्ये कोणतीही अडचण येणार नाही. विशेष म्हणजे पाकिस्तानी आणि तुर्की विद्यार्थ्यांनी सुरक्षेसाठी रंगरंगोटी करून स्वत:हून भारतीय ध्वज तयार केला.
युद्धग्रस्त युक्रेनमधून भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांशी भारत सतत संपर्कात आहे. पुतीन यांनी पश्चिम भागात जाणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षेची हमी दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशीही चर्चा केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App