वृत्तसंस्था
काबुल : तालिबानशी संबंधित अल कायदाने नुकतेच एक निवेदन प्रसिद्ध केले असून यात काश्मीर इस्लामच्या शत्रुंपासून मुक्त करण्याची आक्रमक भाषा केली आहे. अमेरिकेच्या सैन्याचा अपमान आणि पराभव केल्याबद्दल अल कायदाने सुन्नी पश्तून या अमेरिकेने नियुक्त केलेल्या दहशतवादी गटाचे कौतुक केले आणि नंतर त्यांनाच अफगाणिस्तानातून हद्दपार केले. या इस्लामवादी शक्तींना जागतिक जिहाद सुरू करण्यासाठी आता प्रोत्साहन दिले जात आहे.The Pakistan-backed Taliban have begun to show their true colors. Within 24 hours of the US withdrawal from Afghanistan, the Taliban have been pouring poison on India. Al-Qaeda, which includes the Taliban, has said it is time for global jihad.
पॅलेस्टाईन, इस्लामिक मगरेब, सोमालिया, येमेन आणि काश्मीर या मुस्लीमबहुल प्रदेशांना इस्लामच्या शत्रूंपासून मुक्त करा, असेही आवाहन अल-कायदाने केले आहे. तालिबानचे वरिष्ठ नेते शेर मोहम्मद स्टनकझाई यांनी कतारमधील भारतीय राजदूताला नुकतेच आश्वासन दिले आहे की अफगाणिस्तानमध्ये भारतविरोधी कारवायांना परवानगी दिली जाणार नाही. नेमक्या त्याच दिवशी अल-कायदाचे वादग्रस्त आणि प्रक्षोभक विधान आले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अफगाणिस्तानात विजय मिळवल्याचा दावा केला होता. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र ज्या पद्धतीने अमेरिकेने अफगाणीस्थानातून माघार घेतली त्यास मुर्खपणा असे संबोधले. ओसामा बिन लादेनच्या हत्येनंतर अल-कायदा दहशतवादी संघटना निष्प्रभ मानले जात होते. मात्र याच संघटनेने आता तालिबानच्या उदयानंतर पुन्हा धमकावणे चालू केले आहे.
अल-कायदाने तालिबानचा सर्वोच्च नेता मुल्ला हिबतुल्लाची निष्ठा मागितली आहे. वास्तविक तालिबानने आजवर कधीच काश्मीरचा मुद्दा मांडलेला नाही. मात्र त्याचवेळी तालिबानने अल कायदा या दहशतवादी गटावरही कधी टिका केलेली नाही.
सध्या अफगाणिस्तानात सत्तेवर आलेल्या तालिबान्यांमध्येही गटतट असल्याची चर्चा आहे. मात्र हे सगळेच गट कडवे मुस्लीम असून त्यांना जिहाद (धर्मयुद्ध)साठी भडकावले जात आहे. तालिबानने काबूलवर कब्जा केल्यामुळे दहशतवादी मुस्लिम गटांची आशा वाढली आहे.
यामुळेच अल कायदाने तालिबानला काश्मीर, पॅलेस्टाईन, येमेन आणि इतर “इस्लामिक भूमी” मुक्त करण्याचे आवाहन केले आहे. जसे अफगाणिस्तानला अमेरिकेच्या ताब्यातून मुक्त केले त्याप्रमाणे इतर इस्लामी देशही काफिरांच्या ताब्यातून “मुक्त” करा असे आवाहन तालिबानला करण्यात आले आहे.
तालिबानचे अभिनंदन करणाऱ्या संदेशात, अल कायदाने म्हटले आहे की, अफगाणिस्तानातील बंडखोरांच्या विजयाने इस्लामी राष्ट्र किती सक्षम असू शकते हे दाखवून दिले आणि “जिहाद हा एकमेव मार्ग आहे” असल्याचेही सिद्ध केले. “संघर्षाच्या पुढच्या टप्प्यासाठी तयारी करण्याची वेळ आली आहे, ज्याचा मार्ग बदनाम अफगाण राष्ट्राच्या विजयाने मोकळा झाला आहे,” असे अल कायदाने म्हटले आहे. तालिबानचा विजय ही सुरुवात असल्याची फुशारकी अल-कायदाने मारली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App