
वृत्तसंस्था
कंपाला : युगांडातील एका शाळेवर इसिसशी संलग्न एडीएफ दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, यामध्ये 40 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. मृतांमध्ये बहुतांश विद्यार्थी आहेत. हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी शाळेला आग लावली. यामध्ये वसतिगृह जाळण्यात आले, तर अतिरेक्यांनी खाद्यपदार्थांचे दुकान लुटले.Terror attack on Ugandan school, 40 killed; An ISIS-affiliated group set the hostel on fire
युगांडातील शाळेवर गेल्या 25 वर्षांतील हा सर्वात मोठा हल्ला आहे. युगांडाच्या अलायड डेमोक्रॅटिक फोर्सेस (एडीएफ) ने मपोंडवे येथील लुबिरिरा माध्यमिक विद्यालयात हा हल्ला केला.
याशिवाय दहशतवाद्यांनी 6 जणांचे अपहरणही केले आहे. ही घटना शुक्रवारी रात्री 11 वाजता घडली. CNN च्या मते, शाळा युगांडा आणि कांगोली सीमेवर आहे. हल्ल्यानंतर दहशतवादी काँगोला पळून गेले. पोलिसांनी सांगितले की, 8 गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यात 20-25 दहशतवादी सामील होते. सर्व दहशतवादी काँगोमधील विरुंगा नॅशनल पार्कमध्ये लपले असावेत, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
दहशतवादी संघटनेने यापूर्वीही अनेक हल्ले केले
एडीएफने यापूर्वी एप्रिलमध्ये एका गावावर हल्ला करून 20 लोक मारले होते. याशिवाय मार्चमध्ये युगांडातील मुकोंडी गावात एडीएफच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यामध्ये 36 जणांचा मृत्यू झाला. राजधानी कंपालामध्ये 2021 च्या आत्मघाती बॉम्बस्फोटासाठी युगांडा सरकारने ADF ला जबाबदार धरले आहे. या हल्ल्यानंतर युगांडाने काँगोमधील एडीएफ तळांवर हवाई हल्लेही केले.
Terror attack on Ugandan school, 40 killed; An ISIS-affiliated group set the hostel on fire
महत्वाच्या बातम्या
- केरळमध्ये पोलिस आणि अभाविप कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष, लाठीचार्ज आणि वॉटर कॅननचा मारा; 14 वर्षांपूर्वी अवयवदानात नियम मोडल्याचा आरोप
- ‘Biporjoy मुळे एकही जीव गेला नाही! अमित शाह यांनी म्हणाले, ‘’हे टीमवर्कचे उत्कृष्ट उदाहरण’’
- काँग्रेसमध्ये जाण्याऐवजी मी विहिरीत उडी घेईन, नितीन गडकरींनी सांगितला किस्सा, म्हणाले- माझा भाजपच्या विचारधारेवर पूर्ण विश्वास
- WATCH : कुस्तीपटू साक्षी मलिकचा व्हिडिओतून नवा दावा, भाजपच्या 2 नेत्यांनी धरणे द्यायला मदत केली, परवानगीही मिळवून दिली