वृत्तसंस्था
नवी दिल्ली : रशियन लढाऊ विमानांनी बुधवारी काळ्या समुद्रात अमेरिकन ड्रोन MQ-9 रीपर पाडले. रशियन जेट आणि अमेरिकन ड्रोन काळ्या समुद्रावर उडत असताना ही घटना घडल्याचा अमेरिकेचा दावा आहे. अमेरिकेने सांगितले की, दोन रशियन Su-27 लढाऊ विमानांनी प्रथम अमेरिकन ड्रोनला घेरले आणि नंतर वरून इंधन सोडले. यामुळे ड्रोनच्या प्रोपेलरचे नुकसान झाले. यानंतर ड्रोनला धडक देऊन काळ्या समुद्रात पाडण्यात आले.Tension increased! Russian planes shoot down US drone, US gives stern warning
दोन्ही महाशक्तींमध्ये तणावाची परिस्थिती
या घटनेनंतर दोन्ही देशांमध्ये संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अमेरिकेच्या हवाई दलाचे जनरल जेम्स हॅकर यांनी रशियाच्या कृतीचे वर्णन अत्यंत बेजबाबदार आणि प्रक्षोभक असे केले आहे. दुसरीकडे रशियाने अमेरिकेचे आरोप फेटाळून लावले. ते म्हणाले की, आमचे लढाऊ विमान कोणत्याही अमेरिकन ड्रोनच्या संपर्कात आलेले नाही. तसेच आम्हाला अमेरिकेशी संघर्ष नको असल्याचे सांगितले.
कुठे आहे हा काळा समुद्र?
काळा समुद्र युरोप आणि आशिया दरम्यान स्थित आहे. याच्या उत्तरेस युक्रेन, वायव्येस रशिया, पूर्वेस जॉर्जिया, दक्षिणेस तुर्की आणि पश्चिमेस बल्गेरिया व रोमानिया हे देश आहेत. रशिया-युक्रेन युद्धामुळे काळ्या समुद्रात गेल्या अनेक महिन्यांपासून तणाव आहे. रशियन आणि अमेरिकन विमाने येथे अनेकदा उड्डाण करतात, परंतु दोन्ही विमाने आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ आहे.
अमेरिकेचा दावा- रशियन विमाने 40 मिनिटे अमेरिकन ड्रोनजवळ उडत राहिली
अमेरिकेच्या लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले की, निशस्त्र रीपर ड्रोन नियमित गस्तीवर होते. युक्रेनच्या क्रिमिया द्वीपकल्पाच्या नैऋत्येस सुमारे 128 किमी अंतरावर दोन रशियन Su-27 लढाऊ विमाने यूएस रीपर ड्रोनभोवती सुमारे 40 मिनिटे उडत होती.
यानंतर या लढाऊ विमानांनी त्यावर उड्डाण करण्यास सुरुवात केली आणि ड्रोनला खाली उतरण्यास भाग पाडले. पेंटागॉनने म्हटले आहे की, युक्रेन युद्धानंतर रशियन आणि अमेरिकन सैन्यांमधील हा पहिला थेट संपर्क आहे. अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पाडलेले ड्रोन अद्याप परत मिळालेले नाही. ते चुकीच्या हाती लागू नये म्हणून आम्ही त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहोत.
रशियन राजदूत म्हणाले- अमेरिकेशी संघर्ष नको आहे
रशियाने अमेरिकेचे आरोप फेटाळून लावले आहेत. स्टंट करत असताना अमेरिकेच्या ड्रोनने वळण घेतल्याने ते क्रॅश झाल्याचे रशियाचे म्हणणे आहे. ते रशियन विमानांच्या संपर्कातही आले नाही. रशियन संरक्षण मंत्रालयाने असेही म्हटले आहे की, एमक्यू-9 रीपर ड्रोन उड्डाणादरम्यान त्याचे ट्रान्सपॉन्डर बंद करत होते जेणेकरून कोणीही त्याचा माग काढू नये.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App