California : कॅलिफोर्नियात मंदिराची तोडफोड, हिंदूविरोधी आक्षेपार्ह घोषणा लिहिल्या, भारताकडून निषेध व्यक्त

California

वृत्तसंस्था

कॅलिफोर्निया : California अमेरिकेच्या कॅलिफोर्निया येथील एका हिंदू मंदिराची तोडफोड करण्यात आली आणि त्यावर आक्षेपार्ह घोषणा लिहिण्यात आल्या. ही घटना चिनो हिल्स परिसरात घडली. सोशल मीडियावर शेअर केलेल्या छायाचित्रांमध्ये ‘मोदी-हिंदुस्तान मुर्दाबाद’ सारख्या घोषणा आणि पंतप्रधान मोदींसाठी अपशब्द वापरलेले दिसत आहेत.California

मंदिर बांधणाऱ्या संस्थेच्या BAPS अमेरिकाने X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर घटनेची माहिती शेअर केली. सात महिन्यांपूर्वी सप्टेंबरमध्ये कॅलिफोर्नियातील सॅक्रामेंटो येथील श्री स्वामीनारायण मंदिरातही अशीच एक घटना घडली होती.



भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने या घटनेचा निषेध केला

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. मंत्रालयाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, आम्ही स्थानिक कायदा अधिकाऱ्यांना आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आवाहन करतो. तसेच, आम्ही प्रार्थनास्थळांवर पुरेशी सुरक्षा व्यवस्था करू.

गेल्या वर्षी अमेरिकेत ६ हिंदू मंदिरांची तोडफोड झाली होती

अमेरिकन हिंदू संघटना CoHNA नेही या घटनेचा निषेध केला आहे. लॉस एंजेलिसमध्ये होणाऱ्या कथित खलिस्तानी जनमत चाचणीच्या काही दिवस आधी ही घटना घडल्याचे संघटनेने म्हटले आहे. २०२२ पासून आतापर्यंत अमेरिकेतील वेगवेगळ्या राज्यांमधील किमान ६ मंदिरांमध्ये हिंदूंसाठी अपशब्द लिहिले गेले आहेत, असेही CoHNA ने म्हटले आहे.

Temple vandalized in California, offensive anti-Hindu slogans written, India expresses protest

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात