विशेष प्रतिनिधी
काबूल – अफगाणिस्तानात तालिबानने एका मुलाची निर्दयतेने हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वडील अफगाणिस्तान रेजिस्टन्स फोर्समध्ये असल्याच्या संशयावरून तालिबानने मुलाची हत्या केली.Taliban fires bullets on street
पंजशीरच्या एका निरीक्षकाने ट्विट करत या हत्येची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले की, तालिबानला त्याच्या वडिलांवर संशय होता. रेजिस्टन्स फोर्समध्ये वडील काम करत असल्याची शिक्षा मुलाला देण्यात आली. मुलावर गोळी झाडून त्याची हत्या केली. सध्या तालिबानचे दहशतवादी हे अकारणपणे नागरिकावर गोळीबार करत आहेत.
तालिबानच्या दहशतवाद्यांकडून रस्त्यावर चालणाऱ्या लोकांना अडवून कसून चौकशी केली जात आहे. तसेच मोबाईल फोनही काढून घेतले जात असून त्याचे कॉल डिटेल्स आणि फोटो तपासत आहेत. या तपासणीत संशय बळावला तर जागीच त्या व्यक्तीची हत्या करत आहेत.
अफगाणिस्तानात सत्ता स्थापन करत असताना तालिबानने देशातील युद्ध थांबले आहे. आता शांतता प्रस्थापित होईल, असे आवाहन केले होते. आपण सर्वांना माफ केल्याचेही त्यांनी म्हटले होते. बदला घेणार नाही, अशी हमी दिली होती. परंतु तालिबान आता संशयित लोकांना ताब्यात घेऊन त्यांची हत्या करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App