‘टायटॅनिक’चे अवशेष शोधण्यास गेलेल्या पाणबुडीचा स्फोट, सर्व पाच जणांचा मृत्यू

ओशन गेट कंपनीने या घटनेबाबत निवदेन जारी करत दिली माहिती

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : बेपत्ता झालेल्या पाणबुडीबाबत एक नवीन अपडेट समोर आले आहे. ओशन गेट कंपनीच्या म्हणण्यानुसार टायटॅनिक जहाजाचे  अवशेष पाहण्यासाठी पाच जणांसह निघालेल्या पाणबुडीचा अद्याप शोध लागलेला नाही. अशा परिस्थितीत आता जहाजावरील सर्व लोकांना मृत समजावे. Submarine to search for Titanic wreckage explodes all five dead

कंपनीने या घटनेबद्दल सांगितले आहे की टायटॅनिककडे निघालेल्या बेपत्ता पाणबुडीवरील पाच क्रू मेंबर्सचा त्यांच्या जहाजाच्या “भयानक स्फोटात” मृत्यू झाला. याबाबत कंपनीने एक निवेदनही जारी केले आहे. या निवेदनात कंपनीने या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांप्रती शोक व्यक्त केला आहे.

या घटनेबाबत कंपनीने एक निवेदन जारी केले आहे. निवेदनात म्हटले आहे की ही माणसे जगातील महासागरांचे अन्वेषण आणि संरक्षण करण्याची अद्भुत आवड असलेले खरे शोधक होते, त्यांच्यात साहसाची विशिष्ट भावना होती. या दुःखाच्या वेळी या पाच जणांच्या आत्म्यास शांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहेत.

Submarine to search for Titanic wreckage explodes all five dead

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात