वृत्तसंस्था
वॉशिंग्टन: कोरोच्या दुसऱ्या लाटेतील स्थिती अधिक गंभीर आहे. संपूर्ण जगात कोरोना स्फोट होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. ब्राझिलमध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा सातत्याने वाढत आहे. जगातील अनेक देशांमध्ये सध्या कोरोनाचा कहर सुरु आहे. मात्र आता कोरोना होण्याची किंवा पसरण्याची इतर कारणही समोर येऊ लागल्याने नक्कीच चिंता वाढणार आहे.study sheds light on reasons why the coronavirus is airborne
आरोग्याविषयी संशोधन करणार्या जगातील सर्वात मोठे वैद्यकीय जर्नल लँसेटने म्हटले आहे की कोरोनाव्हायरस हवेतून पसरतो. आपल्या सर्वेक्षणात जर्नलने असा दावा केला आहे की हवेतून विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याचे पुष्कळ पुरावे आहेत. ब्रिटेन, अमेरिका आणि कॅनडाच्या सहा तज्ज्ञांनी सांगितले की, हवेपासून विषाणूचा प्रसार झाल्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी जे उपाय केले जात आहेत ते कामी येत नाहीये.
तज्ञांनी असे सांगितले आहे की मोठ्या ड्रॉपलेट्सने विषाणूचा सर्वाधिक प्रसार झाल्याचा पुरावा मिळालेला नाही. अशा परिस्थितीत, जागतिक आरोग्य संघटना आणि इतर आरोग्य संस्थांनी व्हायरस पसरण्याच्या सांगण्यात आलेल्या कारणामध्ये बदल करावा, जेणेकरुन संक्रमण रोखले जाऊ शकेल.
शोधनाच्या आढाव्यानंतर हवेतून प्रादुर्भाव होण्याच्या दाव्याला बळकटी देण्यासाठी तज्ञांनी काही पुरावे दिले आहेत. यामध्ये टॉपवर एका सुपरस्प्रेडर इव्हेंटचा उल्लेख आहे. यात कागिट चोयर इव्हेंटविषयी सांगितले आहे. यामध्ये एकाच संक्रमितामुळे 53 लोकांमध्ये व्हायरस पसरला आहे. या घटनेच्या संशोधनात हे स्पष्ट झाले की हे लोक एकमेकांजवळ आले नाहीत आणि भेटले देखील नाहीत. याशिवाय पुन्हा त्याच पृष्ठभागाला स्पर्शही झाला नाही. म्हणजेच, व्हायरस या लोकांमध्ये फक्त हवेनेच पसरला.
इनडोरमध्ये ट्रान्समिशन जास्त:
रिसर्चमध्ये सांगितले आहे की, खुल्या ठिकाणांऐवजी बंद ठिकाणी संक्रमण जास्त तेजीने पसरते. खुल्या जागांवर हवा खेळती राहते यामुळे व्हायरस कमी केला जाऊ शकतो.
सायलेंट ट्रान्समिशनने सर्वात जास्त प्रादुर्भाव: व्हायरसचा सायलेंट ट्रान्समिशन त्या लोकांकडून जास्त होतो, ज्यांच्यात सर्दी, खोकल्याचे लक्षण सापडत नाहीत. व्हायरसच्या एकूण ट्रान्समिशनचा 40% भाग अशा प्रकारच्या संक्रमणानेच होतो. हेच सायलेंट ट्रान्समिशन संपूर्ण जगात व्हायरस पसरण्याचे मुख्य कारण राहिले आहे. याच आधारावर व्हायरस हवेच्या माध्यमातून पसरत असल्याची थेअरी सिद्ध होते.
ड्रॉपलेट्समुळे संक्रमणाचे पुरावे कमी:
संशोधकांनी म्हटले की, ड्रॉपलेट्सच्या माध्यमातून व्हायरस तेजीने पसरण्याचे खूप कमी पुरावे मिळाले आहेत. मोठे ड्रॉपलेट्स हवेत थांबू शकत नाहीत आणि हे पडून पृष्ठभागाला संक्रमित करतात. हवेमधून व्हायरस पसरत असल्याचे मजबूत पुरावे सापडले आहेत. अशा प्रकारच्या व्हायरसच्या ट्रान्समिशनसाठी आवश्यक पावले उचलण्याची गरज आहे.
या संशोधनामध्ये कोऑपरेटिव्ह इन्स्टिटयूट फॉर रिसर्च इन इनव्हायरमेंट सायन्सेसचे केमिस्ट जोस लुईस जिमेनेज हे देखील सहभागी झाले होते. जिमेनेज यांनी याबाबत सांगितलं, हवेच्या माध्यमातून संक्रमण होत असल्याचे ठोस पुरावे मिळाले आहेत. ड्रॉपलेट ट्रान्समिशनला समर्थन देणारे पुरावे मात्र अगदी नगण्य आहेत. जागतिक आरोग्य संघटना आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी काम करणाऱ्या अन्य संस्थांनी हे वैज्ञानिक पुरावे स्वीकारावेत जेणेकरून हवेमुळे होणारे संक्रमण रोखण्यासाठी पावलं उचलता येतील.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App