वृत्तसंस्था
कोलंबो : दिवाळखोर घोषित झालेल्या श्रीलंकेत पंतप्रधान रानील विक्रमसिंघे यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. देशात सर्वपक्षीय सरकारने सत्ता स्थापन करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. Sri Lanka’s prime minister ranil wikarmsinghe resigned, called for all parties government
श्रीलंकेची आर्थिक स्थिती खूपच खराब झाली असून जनतेचा उद्रेक झाला आहे. गेल्याच महिन्यात तत्कालीन पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांचे घर जाळणाऱ्या जनतेने राष्ट्राध्यक्ष गोटाबाय राजपक्षे यांचे सरकारी निवासस्थान “जनाधिपती मंदिरय्या” ताब्यात घेतले आहे. गोटाबाय राजपक्षे यांनी श्रीलंका सोडून पोबरा केला आहे.
श्रीलंकेत सध्या सरकार नावाचा घटक अस्तित्वात नाही. त्यातच आता पंतप्रधान रानील विक्रमसिंघे यांनी राजीनामा दिल्यानंतर श्रीलंकन संसदेचे अध्यक्ष तात्पुरते राष्ट्राध्यक्ष होतील आणि ते देशात सर्वपक्षीय सरकार स्थापन करतील, असे सांगितले जात आहे. मात्र या संदर्भातले तपशील अधिकृतरित्या कोणीच सांगितले नाहीत.
एकीकडे प्रचंड महागाई प्रचंड टंचाई आणि आर्थिक संकट तर दुसरीकडे आता पंतप्रधान रानील विक्रमसिंघे यांच्या राजीनाम्यामुळे उभे राहिलेले राजकीय संकट याच्या खाईत श्रीलंका सापडली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App