श्रीलंका सध्या आर्थिक संकटातून जात आहे. श्रीलंकेत आर्थिक संकटाबाबत सातत्याने सरकारविरोधी निदर्शने होत आहेत. आज श्रीलंकेच्या पोलिसांनी या आंदोलकांवर गोळीबार केला आहे. या गोळीबारात एका तरुणाचा गोळी लागल्याने मृत्यू झाला आहे.Sri Lanka Crisis Police fire on anti-government protesters; One killed, several injured
वृत्तसंस्था
कोलंबो : श्रीलंका सध्या आर्थिक संकटातून जात आहे. श्रीलंकेत आर्थिक संकटाबाबत सातत्याने सरकारविरोधी निदर्शने होत आहेत. आज श्रीलंकेच्या पोलिसांनी या आंदोलकांवर गोळीबार केला आहे. या गोळीबारात एका तरुणाचा गोळी लागल्याने मृत्यू झाला आहे.
घटनेची कबुली देताना, श्रीलंका पोलिस विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले की, जमावाने हिंसक झाल्यानंतर आणि दगडफेक केल्यानंतर त्यांना गोळीबार करावा लागला. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीलंकेतील तेलाची तीव्र टंचाई आणि त्याच्या वाढलेल्या किंमतींच्या निषेधार्थ राजधानी कोलंबोपासून 95 किमी अंतरावर असलेल्या मध्य श्रीलंकेच्या रामबुकाना येथे लोकांनी महामार्ग रोखला होता.
श्रीलंकेच्या इंधन कंपन्यांची तेलाच्या दरात वाढ
महामार्ग ठप्प झाल्यामुळे तेथे निदर्शने सुरू झाली. या घटनेच्या निषेधार्थ तेथे टायर जाळण्यात आले आणि राजधानीकडे जाणारे प्रमुख रस्ते रोखण्यात आले. आज, मंगळवारी, श्रीलंकेची सरकारी तेल कंपनी सिलोन पेट्रोलियम कॉर्पोरेशन (CPC) ने सोमवारी मध्यरात्रीपासून इंधनाच्या दरात वाढ केली आहे. यापूर्वी इंडियन ऑइलच्या स्थानिक ऑपरेशन्सने दरवाढीची घोषणा केली होती.
महिन्याभरात दोनदा भाव वाढले
विशेष म्हणजे, श्रीलंकेला गंभीर आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असून ताज्या निर्णयामुळे सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार आहेत. CPC ने 92 ऑक्टेन पेट्रोलची किंमत 84 रुपयांनी वाढवून 338 रुपये प्रति लीटर केली आहे. ही किंमत आता श्रीलंकन इंडियन ऑइल कंपनी (LIOC) च्या प्रति लिटर किमतीएवढी झाली आहे. CPC ने एका महिन्यात दोनदा किंमत वाढवली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App