वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : अमेरिकेत गोळीबाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. नॉर्थ कॅरोलिनाच्या रॅले येथे गुरुवारी रात्री गोळीबाराची घटना घडली. या हल्ल्यात एका ऑफ ड्युटी पोलीस अधिकाऱ्यासह पाच जणांचा मृत्यू झाला होता. दोन जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे. त्याची चौकशी सुरू आहे.Shooting in North Carolina, USA, 5 dead Police officers among the dead; Second event of the week
रॅलेच्या महापौर मेरी-अॅन बाल्डविन यांनी सांगितले की न्यूस नदी ग्रीनवे परिसरात अनेक लोकांवर गोळीबार करण्यात आला. यात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. जखमींमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश आहे. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
महापौर मेरी म्हणाल्या – देशात गोळीबाराच्या घटना वाढत आहेत. बंदुकीच्या हिंसाचारावर कठोर कायदे करण्याची गरज आहे. आम्ही प्रकरणाचा तपास करत आहोत. सध्या पोलिसांनी जवळपास राहणाऱ्या लोकांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App