ऑस्ट्रेलियातील सिडनी शॉपिंग मॉलमध्ये गोळीबार आणि चाकूहल्ला, 4 ठार, अनेक जखमी


वेस्टफील्ड बाँड जंक्शनच्या शॉपिंग सेंटरमध्ये गोळीबार आणि चाकूहल्ला झाला.


विशेष प्रतिनिधी

सिडनी : ऑस्ट्रेलियातील सिडनी येथील एका शॉपिंग मॉलमध्ये गोळीबार आणि चाकूने हल्ला केल्याच्या घटनेत चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वेस्टफील्ड बाँड जंक्शनच्या शॉपिंग सेंटरमध्ये गोळीबार आणि चाकूहल्ला झाला.Shooting and knife attack in Sydney shopping mall Australia, 4 killed, many injuredया घटनेनंतर शॉपिंग मॉल रिकामा करण्यात येत आहे. पोलिस बचावकार्य करत आहेत. पोलिसांनी हल्लेखोराला ठार केल्याचे वृत्त आहे. मात्र, अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

ऑस्ट्रेलियन न्यूज वेबसाइट news.com.au नुसार, एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, ही घटना घडली तेव्हा मॉलमध्ये गर्दी होती. जमिनीवर सर्वत्र रक्त पसरले होते. मिळालेल्या माहितीनुसार, शेकडो लोकांना मॉलमधून बाहेर काढण्यात आले आहे. न्यू साउथ वेल्स पोलिसांनी लोकांना या भागापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.

या वेबसाइटच्या वृत्तानुसार, एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, तो खरेदी करत असताना एक व्यक्ती एस्केलेटरवरून खाली आला आणि एक व्यक्ती लोकांना चाकू मारत असल्याचे ओरडले. तेवढ्यात त्याला हिरवा शर्ट घातलेला एक माणूस खाली पळताना दिसला.

Shooting and knife attack in Sydney shopping mall Australia, 4 killed, many injured

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात