Russia – Ukraine war : चीन – रशियाची मैत्री!!… ही तर तैवान गिळण्याची तयारी!!


युक्रेन वरील रशियाच्या हल्ल्यानंतर चीनने रशियाचा निषेध तर सोडाच, उलट संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीत “तटस्थ” राहून करावा रशियापुढे मैत्रीचा हात केला आहे. सुरक्षा समितीत जरी चीन “तटस्थ” अर्थ राहिला असला, तरी प्रत्यक्षात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे जेव्हा चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी प्रत्यक्ष फोनवर बोलले तेव्हा त्यांनी त्यांना थेट पाठिंबा व्यक्त केला. चीन – रशियाची ही मैत्री म्हणजे एक प्रकारे तैवान गिळंकृत करण्याची तयारीच असल्याचे आंतरराष्ट्रीय व्यूहरचनात्मक संबंधांमध्ये मानले जात आहे. Russia – Ukraine war : China aiming at grabbing Taiwan by supporting Russia against Ukraine

सध्या तरी युरोप आणि अमेरिका रशियाला “तोंडी दम” देऊन युक्रेनला विविध प्रकारच्या शस्त्रास्त्रांची मदत करण्याचे आश्वासने देत आहेत. पण अद्याप अमेरिका आणि युरोपीय देशांची शस्त्रास्त्रे युक्रेनमध्ये पोहोचलेली नाहीत. युक्रेनची सेना स्वतःच्या शस्त्रास्त्रांच्या बळावर सध्या लढताना दिसत आहे.

पण मुद्दा त्या पलिकडचा आहे. चीनने रशियाला जो उघड पाठिंबा व्यक्त केला आहे, त्यामागे चीनचे स्वतःचे काही व्यूहरचनात्मक आडाखे आहेत आणि हे आडाखे आता आंतरराष्ट्रीय पातळीवर उघडपणे दिसत आहेत. त्यासाठी फार मोठ्या रॉकेट सायन्सचा अभ्यास करण्याची गरज नाही.

गेल्या वर्षभरापासून चीन तैवानला गिळंकृत करण्यासाठी विविध मार्ग अवलंबताना दिसतो आहे. चीनची विमाने अनेकदा तैवानची हवाई हद्द ओलांडून मुक्तपणे विहार करताना दिसत आहेत. ही किंबहुना चीनच्या हवाई हल्ल्याची “प्रॅक्टिस” सुरू असल्याचे अनेक सामरिक तज्ञांचे मत आहे. याचाच अर्थ असा की चीनने रशियाला युक्रेन वरील हल्ल्यात पाठिंबा देण्याच्या बदल्यात चीन जेव्हा ताइवान वर हल्ला करेल तेव्हा रशियाने गप्प राहणे अथवा मदत करणे या पलिकडे दुसरा कोणताही नाही.


Russia-Ukraine war : रशियाच्या विरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा आघाडीचा प्रयत्न, आज UNSC मध्ये पुन्हा मतदान


पण “यूक्रेन” म्हणजे काही “तैवान” नव्हे, असा इशारा तैवानच्या अध्यक्ष साई इंग वेन यांनी दिला आहे. युक्रेनच्या झेंड्यासह तैवानच्या अनेक इमारती मोठमोठ्या लाइटिंगने झळकवण्यात आल्या आहेत. पण तरी देखील चीन जेव्हा तैवान घेण्याचा प्रयत्न करेल तेव्हा चीनला रशियाच्या पाठिंब्याची किंवा गप्प राहण्याची अपेक्षा आहे.

– चीनची तैवानच्या पलिकडची महत्त्वाकांक्षा

त्याचबरोबर चीनची महत्त्वाकांक्षा फक्त तैवान गिळंकृत करणे एवढ्यापुरती मर्यादित मानण्याची सामरिक तज्ञांची अजिबात तयारी नाही किंबहुना चीनला संपूर्ण दक्षिण चीन समुद्रात म्हणजे प्रत्यक्षात पॅसिफिक समुद्रात स्वतःचे लष्करी आणि व्यापारी सर्वंकश वर्चस्व निर्माण करण्याची घाई झाली आहे. यासाठी आग्नेय आशियातील 11 देश आपले अंकित राहावेत यासाठी चीनचे राजनैतिक पातळीपासून ते लष्करी पातळीपर्यंतचे सर्व प्रयत्न आहेत आणि आता त्यांना वेग आला आहे.

– क्वाडशी पंगा अवघड

पॅसिफिक महासागरात अमेरिका – भारत – ऑस्ट्रेलिया आणि जपान यांचा “क्वाड” तयार झाला आहे. परंतु या चौघांनाही आव्हान देण्याइतपत चीनने आपले नौदलशक्ति वाढवल्याचे मानण्यात येत आहे. तरी देखील चीन एकाच वेळेला तैवान गिळंकृत करणे आणि पॅसिफिक महासागरात हल्ला करणे अशी दुहेरी हिमाकत करण्याची शक्यता कमी आहे. एक तर “तैवान” म्हणजे “युक्रेन” नव्हे. आणि पॅसिफिक महासागरातील अमेरिका – भारत – ऑस्ट्रेलिया आणि जपान यांचा “क्वाड” म्हणजे “तैवान” नव्हे…!! याची पक्की जाणीव चीनच्या माओवादी आक्रमक नेतृत्वाला आहे. त्यामुळेच चीनची आक्रमक पावले धिमेपणाने पडताना दिसत आहेत.

रशिया – युक्रेन यांच्यातले संबंध द्विपक्षीय पातळीवरचे आणि कमी व्यामिश्र (complex) आहेत. पण चीन – तैवान यांचे संबंध त्याचबरोबर चीन आणि आग्नेय आशियातील देशांचे संबंध हे जास्त व्यामिश्र (complex) आणि धोकादायक पातळी पर्यंतचे आहेत. त्यामुळे रशियाने युक्रेन वर केलेला हल्ला आणि तैवान गिळंकृत करण्याचा चीनचा मनसूबा यामध्ये व्यूहरचनात्मक पातळीवर गुणात्मक फरक आहे. तरी देखील चीनने रशियाला पाठिंबा दिला आहे. या मागे चीन तैैवानला गिळंकृत करेल तेव्हा रशियाला “गप्प” ठेवणे हाच त्याचा मनसूबा दिसतो आहे…!!

Russia – Ukraine war : China aiming at grabbing Taiwan by supporting Russia against Ukraine

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात