विशेष प्रतिनिधी
मॉस्को : रशियाच्या सरकारने गुगल कंपनीला मोठा दंड ठोठावला आहे. ही रक्कम ३० लाख रुबल्स (४१ हजार १७ डॉलर) इतकी आहे.रशियन युझर्सची वैयक्तिक माहिती रशियन प्रांतामधील डेटाबेसमध्ये स्टोअर केली नाही असा ठपका ठेवण्यात आला होता.Russia fined Google company
गुगलवर यापूर्वीही रशियात कारवाई झाली होती. बंदी असलेली अकाऊंट डिलीट केली नाहीत म्हणून दंड ठोठावण्यात आला होता.रशियात सरकारचे समर्थक असणाऱ्या व्यक्ती तसेच प्रसार माध्यमांची युट्यूबवरील काही अकाऊंट गुगलने ब्लॉक केली आहेत. त्यामुळे सरकारी अधिकारी गुगलवर संतापले आहेत.
रशियात सरकार आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अमेरिकेच्या पाच प्रमुख कंपन्यांमध्ये अनेक वेळा तणाव निर्माण झाला आहे. गुगलशिवाय अँपल,अँमेझॉन, फेसबुक आणि मायक्रोसॉफ्ट या कंपन्यांना रशियात वेळोवेळी दंडाच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे.
गुगलला या गुन्ह्यासाठी प्रथमच दंड ठोठावण्यात आला आहे. मॉस्कोतील टॅगनस्काय जिल्हा न्यायालयाने ही कारवाई केली. दंड ठोठावण्यात आल्याचा वृत्ताला गुगलकडून दुजोरा देण्यात आला, मात्र आणखी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली नाही.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App