न्यूयॉर्क – अमेरिकेतील शल्यचिकित्सकांना जनुकीयरित्या विकसित केलेल्या डुकराच्या किडनीचे मनुष्यात यशस्वी प्रत्यारोपण करण्यात यश आले आहे. अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग असून प्रत्यारोपण केलेली किडनी व्यवस्थित काम करत असल्याचेही आढळले.Revolutionary experiment in medicine successful in America, transplantation of pig kidney into man
व्हेंटिलेटरवर असलेल्या एका ब्रेन-डेड रुग्णावर केलेले हे अनोखे प्रत्यारोपण ‘मैलाचा दगड’ ठरले आहे. केंद्राचे संचालक डॉ. रॉबर्ट मॉन्टगोमेरी म्हणाले,की जनुकीयरित्या विकसित केलेल्या डुकरातील ही किडनी सामान्यत: मानवी शरीर नाकारणार नाही, अशा प्रकारची आहे.
ब्रेन डेड रुग्णाच्या ओटीपोटाबाहेर पायाच्या वरील बाजूच्या रक्तवाहिनीला ही किडनी जोडण्यात आली. किडनीने तत्काळ मूत्रनिर्मिती व टाकाऊ पदार्थ तयार करण्यास सुरुवात केली. किडनीचे थेट मानवी शरीराच्या आतमध्ये प्रत्यारोपण केलेले नाही. मात्र, किडनी शरीराच्या बाहेर काम करत असल्याने ती शरीरातही काम करू शकत असल्याचे संकेत आहेत.
किडनी अपेक्षेपेक्षा चांगल्या पद्धतीने काम करत आहे. दीर्घकाळापासून संशोधक मनुष्यात प्रत्यारोपण करता येऊ शकतील, असे अवयव डुकरांमध्ये विकसित करण्याचा प्रयत्न करत आहेत. यात किडनीसह हृद्य, फुफ्फुस आणि यकृताचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App