विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कराचीत रामायणाचे सादरीकरण; पाकिस्तानी समाज सहिष्णू असल्याचे प्रदर्शन!!, हे सगळे नुकतेच पाकिस्तानातल्या सिंध प्रांताची राजधानी कराची मध्ये मौज नावाच्या नाटक मंडळीने रामायणातील काही प्रसंग नाट्यरूपाने सादर केले. त्याला कराचीतल्या नाट्यप्रेमींनी चांगला प्रतिसाद दिला. या नाटकाचे दिग्दर्शन योहेश्वर केरार याने केले, तर या नाटकाची निर्मिती राणा काज़मी हिने केली. यातील सर्व कलाकार अर्थातच मुस्लिम होते.
पाकिस्तानी समाज सहिष्णू असल्याने मला कराचीच्या मंचावर रामायण सादर करणे अजिबात भीतीदायक वाटले नाही, असे योहेश्वर केरार याने नंतर सांगितले. या नाटकात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर झाला. त्यामुळे हे नाटक प्रत्ययकारी झाल्याची स्तुती नाट्यसमीक्षकांनी केली.
अर्थात कराचीत पहिल्यांदाच रामायण सादर असे नसून नोव्हेंबर 2024 मध्ये या नाटकाचे मंचन कराचीतच झाले होते. कराचीच्या नाट्य इतिहासात हे नाटक माइलस्टोन ठरेल, असे नाट्य समीक्षक सितारा अर्शद यांनी आपल्या रिपोर्ट मध्ये लिहिले होते. रामायणाच्या कथेने मी प्रभावित झालो त्यामुळे मी रामायण नाटकाचे दिग्दर्शन करायचे ठरवले पाकिस्तानी समाज सहिष्णू असल्याने इथे रामायण सादर करायला कुठली अडचण येईल असे मला तरी वाटले नाही त्यामुळे सगळ्या कलाकारांच्या सहकार्याने रामायणाचा प्रयोग यशस्वी केला, असे दिग्दर्शक योहेश्वर केरारने सांगितले.
यामध्ये सीतेची भूमिका या नाटकाचे निर्माते राणा काज़मी हिनेच केली. तिने आपल्या वेगवेगळ्या सोशल मीडिया अकाउंट वर रामायण नाटकाचे छोटे व्हिडिओ आणि फोटो शेअर केले.
View this post on Instagram A post shared by School Of Visual & Performing Arts (@sovapaofficial)
A post shared by School Of Visual & Performing Arts (@sovapaofficial)
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App