विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Putin India visit ट्रम्प टेरिफला वाटाण्याच्या अक्षता; रशिया बिनदिक्कत सुरू ठेवणार भारताला इंधन पुरवठा!!, ही रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमिर पुतिन यांच्या भारत दौऱ्याची फलश्रुती ठरली. भारताला इंधन पुरवठा सुरू ठेवण्याबरोबरच भारतातील कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प बांधून देण्याचे आश्वासनही रशियाने भारताला दिले.Putin India visit
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेले टेरिफ आणि केलेली दमबाजी यांना तोडीस तोड म्हणून भारताने व्यवस्थित ठरवून रशियन राष्ट्राध्यक्षांच्या भारत भेटीला विशेष राजनैतिक, आर्थिक आणि सामरिक महत्त्व दिले आणि रशियन राष्ट्राध्यक्ष मी सुद्धा ते महत्त्व निभावले. म्हणूनच पुतिन यांनी भारताला विना अडथळा सर्व प्रकारचा इंधनपुरवठा सुरू ठेवण्याची ग्वाही दिली.Putin India visit
– भारत आणि रशिया यांच्यात करार
– भारत आणि रशिया यांच्यातील द्विपक्षीय व्यापार 100 बिलियन डॉलर्स वर नेण्याचे लक्ष्य
– रशियात भारतीयांना नोकरीच्या अधिक संधी. त्यासाठी मनुष्यबळ आदान-प्रदान करार
– युरिया उत्पादनात भारत – रशिया संयुक्त खत प्रकल्पाची निर्मिती करार
– भारतातील बंदर विकास आणि जहाज बांधणीला रशियाचे तांत्रिक सहकार्य करार
– भारत आणि रशिया यांच्या राष्ट्रीय चलनातच दोन्ही देशांचा प्रमुख व्यापार करार
– युरोप आणि आशिया युरेशिया मुक्त व्यापार कराराच्या दिशेने प्रगती
– रशियन नागरिकांसाठी 30 दिवसांचा मोफत व्हिसा
– आरोग्य उपकरण निर्मिती आणि वैद्यकीय शिक्षण करार
– संरक्षण सामग्री आणि साहित्य निर्मितीसाठी तंत्रज्ञान प्रदान करार
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App