विशेष प्रतिनिधी
लंडन : दुर्गा उत्सवावेळी बांगलादेशमधील हिंदू मंदिरांवर काही लोकांनी हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये चार लोक जखमी झाले होते. त्यानंतर लगेच बांगलादेश मधील इस्कॉन टेम्पलवर देखील हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. बांगलादेशमधील हिंदू लोकांची घरे जाळण्यात आली होती. या हिंसाचाराविरुद्ध लंडन येथे बांग्लादेश हाय कमिशनसमोर इस्कॉन भाविकांनी आज आंदोलन शांततापूर्ण मार्गाने अांदाेलन केले हाेते. 500हून अधिक लोक या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.
Protests by Indians in front of the Bangladesh High Commission in London against the violence in Bangladesh
या वेळी आंदोलनकर्त्यांनी बांग्लादेश हाय कमिशनसमोर प्रार्थना देखील म्हटली. त्याचप्रमाणे बांगलादेशमधील हिंदू नागरिकांना संरक्षण मिळावे, त्यांची घरे जाळणे थांबवावे, हिंदूंना न्याय मिळावा असा मजकूर असलेला पोस्टरसह त्यांनी शांततापूर्ण मार्गाने अांदाेलन केले.
बांगलादेशातील हिंदूंचे हत्याकांड संतापजनक, शांतीसेना पाठविण्याची विहिंपची मागणी
या आंदोलनामध्ये सहभागी झालेले वीमलनशु शेखर म्हणतात, बांगलादेश मध्ये जी घटना घडलेली आहे, त्यामुळे येथील लोकांना प्रचंड राग आहे. त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. आज 500 पेक्षा जास्त लोक येथे आंदोलन करण्यासाठी आले आहेत. बांगलादेशमध्ये निष्पाप लोकांच्या झालेल्या हत्ये विरुद्ध आम्ही बहिष्कार करण्यासाठी येथे एकत्र जमलो आहोत. असे त्यांनी यावेळी म्हटले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App