विशेष प्रतिनिधी
पेशावर – पाकिस्तानातील भोंग येथील गणेश मंदिराची ९० टक्के दुरुस्ती झाली असून आजपासून तेथे पूजा सुरू झाली. गेल्या आठवड्यात समाजकंटकांनी मंदिराची विटंबना केली होती.Pooja in Gnesh temple in Pakistan started
भोंग शरीफच्या मंदिराचे पुजारी दास यांनी मंदिराची पूजा सुरू झाल्याचे सांगितले. गावातील लोक आरतीत सामील होत असून स्थानिक नागरिकांनी मंदिराच्या कामात मदत केल्याचे म्हटले आहे. मंदिराला कायम सुरक्षा ठेवावी, अशी मागणी त्यांनी केली.
मंदिर आणि परिसरात पोलिस आणि रेंजर्स नेमण्यात आले आहेत. तरीही हिंदूंच्या दुकांनाना कुलूप लागलेली आहेत. भोंग गावातील हिंदू कुटुंबीय सिंध आणि पंजाब येथील नातेवाइकांकडे स्थलांतरित झाले आहेत. या घटनेने पाकिस्तानची नाचक्की झाल्यानंतर आणि सर्वोच्च न्यायालयाने सरकारचे नाक उपटल्यानंतर मंदिराच्या दुरुस्ती कामाला सुरवात झाली आणि आरोपींची धरपकड झाली.
एका हिंदू कुटुंबाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, आम्ही वेळेवर पोलिसांना हल्ल्याची माहिती दिली होती. त्यामुळे विटंबना रोखता आली असती. परंतु पोलिसांनी कारवाई केली नाही. गावातील स्थिती सामान्य झाल्यानंतर घराकडे जाऊ, असे सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App