फ्रान्सचा दोन दिवसीय दौरा संपवून पंतप्रधान मोदी ‘UAE’ला रवाना


राष्ट्रपती झायेद अल नाह्यान यांची भेट घेणार आहेत.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : फ्रान्सचा दोन दिवसांचा दौरा संपवून पंतप्रधान मोदी आज (शनिवार) यूएईला रवाना झाले आहेत. या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी यूएईचे राष्ट्रपती आणि शासक शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भेट घेतील. या बैठकीत ऊर्जा, अन्न सुरक्षा, संरक्षण यासह विविध क्षेत्रांवर द्विपक्षीय संबंध पुढे नेण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे.  PM Modi leaves for UAE after completing two day visit to France

यासोबतच या भेटीदरम्यान दोन्ही नेते ऐतिहासिक 0 व्यापार करारावरही स्वाक्षरी करू शकतात. UAE दौऱ्याच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, गेल्या वर्षी राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद आणि मी आमच्या भागीदारीच्या भविष्यासाठी रोडमॅपवर सहमत झालो होतो. आमचे संबंध आणखी कसे घट्ट करता येतील याबाबत मी त्यांच्याशी चर्चा करण्यास उत्सुक आहे.

मोदी फ्रान्ससोबतच्या द्विपक्षीय  चर्चेनंतर  म्हणाले होते की, “काल मला फ्रान्सचा सर्वोच्च सन्मान मिळाला, हा संपूर्ण 140 कोटी भारतीयांचा सन्मान आहे. फ्रान्सचा राष्ट्रीय दिवस हा जगासाठी ‘स्वातंत्र्य, समता आणि बंधुता’चे प्रतीक आहे. भारत आणि फ्रान्स नेहमीच दहशतवादाविरुद्धच्या लढाईत सोबत आहेत.”

PM Modi leaves for UAE after completing two day visit to France

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात