वृत्तसंस्था
टोकियो : PM Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की जपानी तंत्रज्ञान आणि भारतीय प्रतिभा या पॉवरहाऊसमध्ये जग बदलण्याची क्षमता आहे. दोन्ही देश कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), सेमीकंडक्टर, क्वांटम कॉम्प्युटिंग, बायोटेक व अवकाश क्षेत्रात क्रांती घडवण्यास सक्षम आहेत. शुक्रवारी दोन दिवसांच्या जपान दौऱ्याच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान मोदींनी अनेक कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. PM Modi
भारतावर ट्रम्पनी लादलेल्या ५०% शुल्काच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या ऐतिहासिक भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींनी भारत-जपान बिझनेस फोरममध्ये सांगितले की, भारत लवकरच तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. भारत-जपानमधील प्रत्येक क्षेत्रात सहकार्य वाढले आहे. संध्याकाळी उशिरा त्यांनी जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांची भेट घेतली. यादरम्यान, संयुक्त निवेदनात इशिबा म्हणाले की भारत-जपान सहकार्याची रूपरेषा तयार करण्यात आली आहे. पुढील दहा वर्षांत जपान भारतात ६ लाख कोटी रुपये गुंतवेल. त्यांनी भारत आणि जपानच्या एमएसएमई आणि स्टार्टअप्सना जोडण्यावर भर दिला. मोदींनी इशिबाला भारत भेटीसाठी आमंत्रित केले.
अमेरिकेशी व्यापार करारावर चर्चा सुरू- गोयल
वाणिज्य मंत्री पियुष गोयल म्हणाले आहेत की अमेरिकेशी व्यापार करारासाठी चर्चा सुरू आहे. ते म्हणाले, अमेरिकेने लादलेल्या ५०% कराचा आपल्या अर्थव्यवस्थेवर फारसा परिणाम होणार नाही. गोयल म्हणाले, आम्हाला परस्पर हितसंबंधांवर आधारित व्यापार करायचा आहे, आम्ही दबावापुढे झुकणार नाही. अमेरिकन वित्तीय सेवा कंपनी जेफरीजने खुलासा केला आहे की अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी रागाच्या भरात भारतावर ५०% कर लादला आहे. कारण भारताने पाकिस्तानसोबतच्या अलिकडच्या संघर्षात अमेरिकेच्या मध्यस्थीचा दावा नाकारला होता. ट्रम्प यांचे व्यापार सल्लागार पीटर नवारो यांनी आरोप केला आहे की भारत रशियासाठी तेल मनी लाँड्रिंगचे केंद्र बनला आहे. नवारो म्हणाले, भारत सतत रशियाकडून शस्त्रे खरेदी करत आहे आणि अमेरिकन कंपन्यांकडून लष्करी तंत्रज्ञान हस्तांतरणाची मागणी केेली.
जागतिक अर्थव्यवस्थेसाठी भारत- चीन सहकार्य महत्त्वाचे : मोदी
पंतप्रधान माेदी म्हणाले की, जागतिक अर्थव्यवस्थेत स्थिरता आणण्यासाठी भारत आणि चीन यांच्यात सहकार्य वाढणे हे आवश्यक आहे. एका जपानी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मोदी म्हणाले की, सध्या जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्थांना एकत्र यावे लागेल. भारताला परस्पर आदर आणि संवेदनशीलतेने चीनशी संबंध वृद्धिंगत करायचे आहेत. मोदी-जिनपिंग बैठक : एससीओ बैठकीत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी शनिवारी संध्याकाळी चीनमधील तियानजिन येथे पोहोचतील. ३१ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. १ सप्टेंबर रोजी ते रशियाचे अध्यक्ष पुतीन यांची भेट घेतील. एससीओ शिखर परिषदेदरम्यान मोदी जिनपिंग यांच्याशीही चर्चा करण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शोरिंजन मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांनी दारुमा बाहुली भेट दिली. शुभेच्छा दर्शवणारी ही बाहुली भारतीय बौद्ध भिक्खूंचे प्रतीक आहे. या लाल बाहुलीशी संबंधित एक जपानी म्हणदेखील आहे, जी सात वेळा पडण्याची आणि आठ वेळा उठून उभे राहण्याची प्रेरणा देते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App