PM Modi Egypt Visit: पंतप्रधान मोदींच्या स्वागतावेळी इजिप्तशियन तरुणींने गायलं ‘शोले’ चित्रपटातील ‘हे’ गाणं!


जाणून घ्या, मोदींची काय होती प्रतिक्रिया आणि तरुणीला त्यांनी नेमकं काय विचारलं?

विशेष प्रतिनिधी

कैरो : इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (२४ जून) दोन दिवसांच्या राज्य दौऱ्यासाठी कैरो येथे दाखल झाले. जेव्हा पंतप्रधान मोदी कैरोच्या रिट्झ कार्लटन हॉटेलमध्ये पोहोचले तेव्हा भारतीय वंशाच्या लोकांनी त्यांचे भव्य स्वागत केले. PM Modi Egypt Visit Egyptian girls sang the song from the movie Sholay  during the reception of Prime Minister Modi

विशेष बाब म्हणजे मोदींचे स्वागत करण्यासाठी पोहोचलेल्या इजिप्शियन तरुणीने प्रचंड गाजलेल्या ‘शोले’ चित्रपटातील ‘’ये दोस्ती हम नहीं तोडेंगे’’ हे गाणे गायले. या तरुणींने न्यूज एजन्सी एएनआयला सांगितले की,  मोदींनी तिला सांगितले की तू भारतीय दिसत आहेस. हे ऐकून तीही स्वत: आनंदी झाली. विशेष म्हणजे या तरुणीचे गाणे ऐकून मोदींनीही टाळ्या वाजवून तिचे कौतुक केले.

एएनआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, गाणे गाणारी मुलगी जेना म्हणाली, ‘पीएम मोदींना भेटून खूप आनंद झाला. त्यांनी मला विचारले की तू कधी भारतात गेली होतीस का?,  त्यावर मी नाही असे म्हटले. मग त्यांनी मला हिंदी कुठून शिकलीस असे विचारले, तर मी भारतीय चित्रपट आणि गाणी ऐकून हिंदी शिकल्याचे त्यांना सांगितले.

तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी इजिप्तच्या दोन दिवसांच्या राज्य दौऱ्यासाठी कैरो येथे शनिवारी सायंकाळी पोहोचले. पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच इजिप्त दौरा आहे. कैरो विमानतळावर इजिप्तच्या पंतप्रधानांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले, त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अल हकीम मशिदीला भेट देतील. यानंतर ते हेलिओपोलिस वॉर सेमेटरीला भेट देतील. त्यानंतर ते इजिप्शियन प्रेसिडेंसीमध्ये आयोजित कार्यक्रमात सहभागी होतील. याशिवाय मोदी इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष एल सिसी यांचीही भेट घेणार आहेत.

PM Modi Egypt Visit Egyptian girls sang the song from the movie Sholay  during the reception of Prime Minister Modi

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात