या हल्ल्यात भारतीय लष्कराचे सात जवान शहीद झाले होते.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि मोस्ट वॉन्टेड दहशतवादी शाहिद लतीफची पाकिस्तानमध्ये हत्या करण्यात आली आहे. 2016 मध्ये पंजाबमधील पठाणकोट एअरबेसवर दहशतवादी हल्ला झाला होता. Pathankot attack mastermind Shahid Latif killed in Pakistan
जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हा हल्ला केला होता. या हल्ल्यात भारतीय लष्कराचे सात जवान शहीद झाले. एनआयएच्या तपासात शाहिद लतीफ हा या हल्ल्याचा मास्टरमाईंड असल्याचे समोर आले आहे.
पठाणकोट दहशतवादी हल्ल्याची योजना पाकिस्तानातच घडवून आणली गेली होती, असेही एनआयएच्या तपासात उघड झाले आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने चार आत्मघाती हल्लेखोरांना प्रशिक्षण देऊन हल्ला करण्यासाठी पाठवले होते.
लतीफ जैशचा लाँचिंग कमांडर म्हणून ओळखला जातो. त्याने जैश-ए-मोहम्मदच्या चार दहशतवाद्यांना पठाणकोटमध्ये पाठवले होते. 47 वर्षीय शाहिद लतीफ हा पाकिस्तानातील गुजरानवाला येथील अमीनाबाद शहरातील रहिवासी होता.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App