पोर्ट सुदान विमानतळावर प्रवासी विमान कोसळले, चार लष्करी जवानांसह नऊ जणांचा मृत्यू!

सुदानमध्ये सुरू असलेल्या गृहयुद्धात आतापर्यंत 1100 हून अधिक लोक मारले गेले आहेत.

विशेष प्रतिनिधी

सुदान :  सुदानमधील पोर्ट सुदान विमानतळावर नागरी विमानाचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. ज्यामध्ये चार लष्करी जवानांसह ९ जण ठार झाल्याची माहिती आहे. या अपघातात एका मुलीचाही मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. Passenger plane crashed at Port Sudan airport nine people died including four military personnel

सुदानच्या लष्कराने एक निवेदन जारी करून विमान अपघाताची माहिती दिली आहे. या अपघातात एका मुलीलाही जीव गमवावा लागल्याचे लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सुदानच्या लष्कराने जारी केलेल्या निवेदनात एंटोनोव्ह विमानात उड्डाण करताना काही तांत्रिक बिघाड झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे विमान कोसळले आणि जमिनीवर पडले. यानंतर विमानाला आग लागली.

विशेष म्हणजे, यावर्षी १५ एप्रिलपासून सुदानमध्ये सशस्त्र दल आणि निमलष्करी रॅपिड सपोर्ट फोर्स (RSF) यांच्यात युद्ध सुरू आहे. लढाईमुळे पोर्ट सुदान विमानतळ हे प्रवासी, राजनैतिक मिशनचे सदस्य आणि उत्तर आफ्रिकन देशातून बाहेर पडण्यासाठी सुदानी नागरिकांसाठी एक्झिट पॉईंट बनले आहे.

सुदानमध्ये सुरू असलेल्या गृहयुद्धात आतापर्यंत 1100 हून अधिक लोक मारले गेले आहेत. सुदानमध्ये रविवारी गृहयुद्धाचे 100 दिवस पूर्ण झाले. सुदानच्या आरोग्य मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, हिंसाचारात आतापर्यंत किमान 1,136 लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, सुदान युद्धाच्या निरीक्षकांचे म्हणणे आहे की मृतांची संख्या जास्त असल्याचा अंदाज आहे. कारण या युद्धात मारल्या गेलेल्या अनेक लोकांच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. एका अंदाजानुसार, या युद्धादरम्यान सुदानमधून आतापर्यंत 30 लाखांहून अधिक लोकांनी पलायन केले आहे.

Passenger plane crashed at Port Sudan airport nine people died including four military personnel

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात