पाकिस्तानी तरुणीचं जडले भारतीयावर प्रेम; प्रवासी व्हिसासाठी थेट पंतप्रधान मोदींना विनंती

वृत्तसंस्था

कराची : भारतीय प्रियकरासोबत लग्नगाठ बांधण्यासाठी भारताचा व्हिसा दिला जावा,अशी मागणी पाकिस्तानातील एका तरुणीनं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. Pakistani Girl Appeals To PM Narendra Modi For Visa

प्रेमाला कशाचंही बंधन नसतं. प्रेमात जात-धर्म आणि अगदी सीमाही ओलांडल्या जातात. असं एक प्रकरण आता पाकिस्तानातून समोर आले आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या कराची येथे राहाणाऱ्या सुमन रंतीलाल हिला दीड वर्षापूर्वी भारतातील रहिवासी अमितवर प्रेम झालं. हे दोघंही तेव्हापासूनच प्रेमाच्या बंधनात बांधले गेले आहेत. याच कारणामुळे सुमननं बॉर्डर क्रॉस करण्यासाठी मोदी सरकारकडे विशेष परवानगी मागितली आहे.

सुमन एक शिक्षिका आहे. ती सध्या MPhil करत आहे. सुमननं पाकिस्तानात असलेल्या भारतीय उच्चायोगात आपल्या ट्रॅव्हल व्हिसासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे जमा केली आहे. मात्र, कोरोनामुळे तिला व्हिसा मिळालेला नाही.

सुमनचा बॉयफ्रेंड पंजाबच्या गुरदासपूर जिल्ह्याच्या श्री हरगोबिंदपुर येथे राहातो. २०१९ मध्ये सुमन आणि अमित फेसबुकद्वारे भेटले होते. यानंतर त्यांचं एकमेकांवर प्रेम जडलं आणि आता या दोघांनाही लग्नगाठ बांधायची आहे. २०२०पासूनच कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता भारत आणि पाकिस्तानदरम्यान प्रवासासाठी बंदी घातली आहे. याच कारणामुळे सुमनला भारतात प्रवेश करण्यास अडचणी येत आहेत.

Pakistani Girl Appeals To PM Narendra Modi For Visa

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात