स्फोट इतका भीषण होता की वाहनाचा अक्षराशा चुराडा झाला.
विशेष प्रतिनिधी
लाहोर : पाकिस्तानमध्ये सोमवारी रात्री मोठा दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी रिमोट कंट्रोलने एक वाहन उडवले. ज्यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला आहे. हे संपूर्ण प्रकरण बलुचिस्तानच्या पंजगुर जिल्ह्याशी संबंधित आहे. दहशतवाद्यांनी भूसुरुंग पेरली होती, वाहन भूसुरुंगावरून जात असताना दहशतवाद्यांनी त्याचा स्फोट केला. स्फोट इतका भीषण होता की, कारचा अक्षराशा चुराडा झाला. याप्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे. Pakistan UC chairman among 7 killed in blast in Balochistans Panjgur
पंजगुरचे उपायुक्त अमजद सोमरो यांनी सांगितले की, बालगातार युनियन कौन्सिलचे अध्यक्ष इश्तियाक याकूब एका लग्न समारंभातून परतत होते, त्यांच्यासोबत कारमधून इतर लोकही प्रवास करत होते. त्यांच्या वाहनाला लक्ष्य करण्यासाठी दहशतवाद्यांनी रिमोट स्फोटक यंत्र पेरले होते. हे वाहन बलगातर भागातील चाकर बाजार येथे पोहोचले असता स्फोट झाला. या स्फोटात सात जणांचा जागीच मृत्यू झाला.
Pakistan: UC chairman among 7 killed in blast in Balochistan’s Panjgur Read @ANI Story | https://t.co/Qdr5dvEzez#Pakistan #blast #Balochistan #Panjgur pic.twitter.com/YtGDwgR2eO — ANI Digital (@ani_digital) August 7, 2023
Pakistan: UC chairman among 7 killed in blast in Balochistan’s Panjgur
Read @ANI Story | https://t.co/Qdr5dvEzez#Pakistan #blast #Balochistan #Panjgur pic.twitter.com/YtGDwgR2eO
— ANI Digital (@ani_digital) August 7, 2023
2014 मध्ये पंजगुर जिल्ह्यात असाच हल्ला झाला होता. त्यानंतर 10 जणांचा मृत्यू झाला होता. प्रतिबंधित बलुच लिबरेशन फ्रंटने (बीएलएफ) हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. आजच्या घटनेत त्याच संघटनेचा हात असल्याचा संशय अधिकाऱ्यांचा आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App