Pakistan : 9 दहशतवादी अड्ड्यांवर दुरुस्तीचे काम; ऑपरेशन सिंदूरमध्ये उद्ध्वस्त ‘अतिरेकी कारखाने’ पुन्हा सुरू

Pakistan

वृत्तसंस्था

इस्लामाबाद : Pakistan  पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ७ मेच्या रात्री ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानमधील ९ दहशतवादी कारखाने उद्ध्वस्त केले. परंतु, पाकिस्तानने पुन्हा या तळांची दुरुस्ती ‘ना-पाक’ सुरू केली आहे. अडीच महिन्यांनंतर हे काम केले जात आहे. लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद सारख्या दहशतवादी संघटनांद्वारे चालणाऱ्या मदरशांमध्ये विद्यार्थी परतले आहेत. या तळांवरील विध्वंसाची भरपाई करण्यासाठी पाकिस्तानी लष्कर आणि शाहबाज सरकारने सरकारी तिजोरी उघडली आहे.Pakistan

यापूर्वी ५० कोटी रुपयांचा निधी जारी करण्यात आला होता, परंतु सूत्रांच्या माहितीनुसार, या ९ दहशतवादी तळांसाठी सुमारे १०० कोटींचा निधी देण्यात आला आहे. ताे वाढवण्यासाठी लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी पुढाकार घेतला आहे. मुनीर यांनी पाक लष्कर कल्याण, लष्कर गृहनिर्माण योजनेतून निधी वळवण्याचे आदेश दिल्याचे कळते. ही रक्कम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना देण्यात येणाऱ्या मदतीपेक्षा वेगळी असेल. पाकिस्तान सरकार आणि लष्कराने सुमारे १५ कुटुंबांना १० कोटी रुपये मदत म्हणून देण्याची घोषणा केली आहे. मुनीरचे ‘जैश’ प्रेम, ‘लष्कर’ बाजूला केले: सूत्रांनुसार, लष्करप्रमुख असीम मुनीर यांचा जैश-ए-मोहम्मदकडे कल वाढत आहे.Pakistan



जैशचे मुख्यालय असलेल्या बहावलपूरमधील सुभान अल्लाह मशिदीच्या निगराणीचा अहवाल थेट त्यांच्याकडे जातो. जैशचा प्रमुख मसूद अझहरही आयएसआयच्या एका खास सेफ हाऊसमध्ये आहे. दर पंधरा दिवसांनी त्याचे ठिकाण बदलले जात असल्याचे कळले आहे. प्रत्यक्षात, बहावलपूर दक्षिण पंजाबमध्ये आहे, जिथून भारताची राजस्थान-पंजाब सीमा जवळ आहे. येथून दहशतवाद्यांना घुसवण्याची पाक लष्कराची योजना आहे. दुसरीकडे, लष्कर-ए-तैयबा प्रमुख हाफिज सईद लष्कराच्या सेफ हाऊसमध्ये आहे, परंतु पाक सरकार आता त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे.

पीओके… दहशतवादी लाँच पॅड, मदरशांसाठी दिले ४० कोटी रुपये

भारताच्या हल्ल्यात पीओके (पाकव्याप्त काश्मीर) मधील मुझफ्फराबाद येथील दहशतवादी लाँच पॅड उद्ध्वस्त झाले. हे लाँच पॅड प्रत्यक्षात निवासी ब्लॉक आहेत जिथून दहशतवादी भारतात घुसखोरी करतात. कोटली आणि भिंबरमधील मदरशांच्या दुरुस्तीचे काम देखील सुरू झाले आहे. विद्यार्थी आता या ठिकाणी परतले आहेत. दहशतवादी संघटना जैशचा येथे तळ आहे. पाकिस्तान सरकार आणि लष्कराने पीओकेमधील दहशतवादी लाँच पॅड आणि मदरशांच्या दुरुस्तीसाठी सुमारे ४० कोटी रुपयांचा निधी जारी केला आहे.

पंजाब… लष्कर-जैश संघटनांच्या अड्ड्यांसाठी दिले ६० कोटी रुपये

‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारताने पाकच्या पंजाब प्रांतात लष्कर-ए-तैयबाच्या मुरीदके व जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय बहावलपूरवर सर्वात मोठा हल्ला केला. पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर,पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी त्यांच्याकडून निधी देण्याची घोषणा केली. ती सरकारी निधीपेक्षा वेगळी असेल. सूत्रांनुसार, ती लष्कर कल्याण निधीतून दिली जाईल. भारतीय हल्ल्यांमुळे पंजाब प्रांतातील सियालकोट, शकरगढमधील दहशतवादी अड्ड्यांचेही नुकसान झाले. पंजाब प्रांतात दुरुस्तीसाठी ६० कोटी रुपये दिले आहेत.

परदेशातून कर्ज घेत ते इकडे वळवले जातेय

कर्जाच्या ओझ्याने दबलेला पाक आयएमएफ (आंतरराष्ट्रीय नाणेनिधी), एडीबी (आशियाई विकास बँक) सारख्या परदेशी संस्थांच्या दाराशी कर्जासाठी कटाेरा घेऊन उभा आहे. अलीकडेच पाकिस्तानला आयएमएफकडून १२ हजार कोटी रुपयांची वाढीव मदत मिळाली. एडीबीने सुमारे ७ हजार कोटी रुपयांची मदत दिली. सूत्रांनुसार, पाकिस्तानने या रकमेचा काही भाग दहशतवादी अड्ड्यांच्या दुरुस्तीकडे वळवला. बहावलपूरच्या सुभान अल्लाह मशिदीच्या दुरुस्तीचे काम त्यात प्रमुख आहे. आयएमएफ, एडीबीकडून मिळालेली कर्जाची रक्कमही मुझफ्फराबादच्या अब्बास मशिदीकडे वळवण्यात आली. तथापि, पाकिस्तान सरकार किंवा लष्कर निधीचा स्रोत स्पष्टपणे सांगण्यास नकार देत आहे.

Pakistan Repairs Terror Camps After Operation Sindoor

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात