Pakistan : पाकिस्तान बाॅम्बस्फाेटाने हादरले, खैबर पख्तूनख्वा प्रांतात क्रिकेट सामन्यादरम्यान भीषण स्फोट

Pakistan

विशेष प्रतिनिधी

इस्लामाबाद : Pakistan  पाकिस्तान पुन्हा एकदा बाॅम्बस्फाेटाने हादरले असून बाजौर जिल्ह्यातील खार तालुक्यातील कौसर क्रिकेट मैदानात शनिवारी संध्याकाळी सुरू असलेल्या स्थानिक क्रिकेट सामन्यादरम्यान अचानक बॉम्बस्फोट झाला. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून मुलांसह अनेक प्रेक्षक जखमी झाले आहेत.Pakistan

डॉन वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, जिल्हा पोलिस अधिकारी वकास रफीक यांनी सांगितले की, हा स्फोट इम्प्रोव्हाईज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाइस (IED) च्या साहाय्याने करण्यात आला. त्यांच्या मते, हा हल्ला पूर्णपणे नियोजनबद्ध होता, यामागे सखोल तयारी करण्यात आली होती. मात्र, या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही.Pakistan



सामना पाहण्यासाठी शेकडो नागरिक मैदानात उपस्थित होते. स्फोट झाल्याबरोबर मैदानात प्रचंड गोंधळ उडाला. पालकांनी मुलांना उचलून सुरक्षित स्थळी धाव घेतली. अनेकांना किरकोळ जखमा झाल्या तर काहींना गंभीर दुखापत झाली. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे स्थानिक प्रशासनाने सांगितले.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, याच सुमारास दहशतवाद्यांनी क्वाडकॉप्टर ड्रोनच्या साहाय्याने पोलीस ठाण्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षादलांनी तो प्रयत्न हाणून पाडला. या घटनेनंतर बाजौर आणि खार परिसरात सुरक्षा दलांची मोठी कुमक तैनात करण्यात आली आहे. सीमावर्ती भाग असल्याने या जिल्ह्यात पूर्वीपासूनच अतिरेक्यांची वर्दळ असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. पाकिस्तान सरकारने घटनेचा निषेध व्यक्त केला असून हल्लेखोरांना शोधून काढण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

बाजौर जिल्हा अफगाणिस्तानच्या सीमेजवळ असून येथे अनेकदा तालिबानशी संबंधित दहशतवादी हालचाली आढळल्या आहेत. मागील काही वर्षांत येथे अनेक आत्मघाती हल्ले, पोलिस व सैन्यावर घातपात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे स्थानिक नागरिक कायम भीतीच्या छायेत जीवन जगत आहेत.

Pakistan rocked by bomb blast, Khyber Pakhtunkhwa province during cricket match

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात