इम्रान खान यांना कोणत्याही क्षणी अटक : महिला न्यायाधीशांना धमकावण्याचे प्रकरण, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात इस्लामाबाद न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. हे प्रकरण एका महिला न्यायाधीशाला धमकावण्याशी संबंधित आहे. याआधी खान यांच्याविरोधात 3 प्रकरणांमध्ये अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. यापैकी एका प्रकरणात त्यांना तुरुंगात जाण्यापासून दिलासा मिळाला आहे.Pakistan Ex PM Imran Khan Will be Arrested Any Moment, Women Judge Threaten Case

सोमवारी, न्यायालयाने पोलिसांना दिलेल्या आदेशात म्हटले आहे- इम्रान यांना अटक केल्यानंतर त्यांना 29 मार्चला आमच्यासमोर हजर करा. गत वर्षी 20 ऑगस्ट रोजी इम्रान यांनी आपल्या विरोधात आदेश देणाऱ्या जेबा चौधरी यांना न्यायालयाच्या आवारात धमकी दिली होती.



अटकेसाठी पोलिसांनी आणले हेलिकॉप्टर

‘जिओ न्यूज’च्या वृत्तानुसार, लाहोर पोलिसांचे एक पथक आणि रेंजर कमांडोंचे पथक इम्रान खान यांच्या लाहोरमधील ‘जमान पार्क’ येथील घरी पोहोचले आहे. आता केव्हाही पोलीस आणि रेंजर्सचे पथक खान यांच्या समर्थकांना पिटाळून लावून त्यांना अटक करेल, असा अंदाज आहे. त्यानंतर त्यांना हेलिकॉप्टरने इस्लामाबादला आणले जाईल.

कोर्टाचे कठोर आदेश, 29 मार्चपर्यंत हजर करा!

सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान जिल्हा न्यायाधीश राणा मुजाहिद रहीम यांनी आदेशात म्हटले – देशाच्या न्यायव्यवस्थेचा आदर करणे खूप महत्त्वाचे आहे. कोणी कितीही मोठा असो किंवा तो कोणत्याही पदावर असो, त्याने न्यायाधीशांना उघडपणे धमकावले तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे.

तोशाखाना (सरकारी खजिन्यातील) भेटवस्तू नाममात्र किमतीत विकत घेऊन नंतर कोट्यवधी रुपयांना विकल्याप्रकरणी गेल्या आठवड्यातही इम्रान यांच्याविरुद्ध अटक वॉरंटही जारी करण्यात आले होते. या प्रकरणात त्यांना सोमवारपर्यंत म्हणजेच आजपर्यंत दिलासा मिळाला आहे. यावरही निर्णय होऊ शकतो.

सुनावणीदरम्यान इम्रान खान यांच्या वकिलाने युक्तिवादात सांगितले- खान यांचे वय 71 वर्षे आहे. त्यांच्या पायावर प्लास्टर आहे. याशिवाय ते कोर्टात हजर झाले तर त्यांची सुरक्षाही धोक्यात येईल. यावर न्यायाधीश राणा रहीम म्हणाले – या देशातील सुरक्षेची जबाबदारी पोलिस आणि इतर विभागांवर आहे. तुम्हाला प्रत्येक बाबतीत दिलासा दिला जाऊ शकत नाही. आम्ही इम्रान यांना अटक करण्याचे आदेश जारी करत आहोत. पोलिसांनी त्यांना 29 मार्चपूर्वी हजर करावे.

आतापर्यंत 80 गुन्हे दाखल

खान यांच्यावर आतापर्यंत एकूण 80 गुन्हे दाखल आहेत. खान यांच्यावर तोशाखान्यात जमा केलेल्या भेटवस्तू स्वस्तात खरेदी करून जास्त किमतीत विकल्याचा आरोप आहे. याबाबत पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने त्यांना 5 वर्षांसाठी अपात्र घोषित केले आहे. त्यांचे संसद सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे. या निर्णयाविरोधात इम्रान समर्थकांनी निवडणूक आयोग (EC) कार्यालयाबाहेर हिंसक निदर्शने केली, ज्यात काही लोक जखमीही झाले. या घटनेनंतर खान यांच्याविरोधात दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत वॉरंट जारी करण्यात आले होते.

गतवर्षी 20 ऑगस्ट रोजी इस्लामाबादमधील रॅलीदरम्यान इम्रान यांनी महिला न्यायाधीश आणि पोलिस अधिकाऱ्यांना उघडपणे धमकावले होते. दरम्यान, इम्रान यांचा पक्ष पीटीआयच्या लीगल टीमने खान यांच्या अटकेपूर्वी इस्लामाबाद उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. तो सोमवारी फेटाळण्यात आला.

Pakistan Ex PM Imran Khan Will be Arrested Any Moment, Women Judge Threaten Case

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात