वृत्तसंस्था
इस्लामाबाद : Mohsin Naqvi आशिया कपमधील दारुण पराभवानंतर पाकिस्तानमध्ये पीसीबी अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याविरुद्ध निदर्शने तीव्र झाली आहेत. क्रिकेट चाहते तसेच माजी क्रिकेटपटूंनी नक्वी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. परिस्थिती अशी होती की रविवारी पाकिस्तानमधील लोकांनी अंतिम सामना संपण्यापूर्वीच त्यांचे टेलिव्हिजन बंद केले. इस्लामाबादचे अस्लम खान म्हणाले भारताकडून दोन सामने गमावल्यानंतर फारशी आशा नव्हती. परंतु अंतिम सामन्यात पाकिस्तानने केलेली फलंदाजी पाहून भारत सामना जिंकेल हे स्पष्ट झाले.Mohsin Naqvi
माजी क्रिकेटपटू आकिब जावेद म्हणाले, पाक संघ मानसिकदृष्ट्या अयोग्य होता. बाबर आझम व रिझवानसारख्या खेळाडूंचा सहभाग नव्हता. जावेद म्हणाले, पीसीबी अध्यक्ष नक्वी संघ निवडीत राजकारण करत आहेत. त्यांनी राजकारण संसदेत करावे. माजी पाकिस्तानी आंतरराष्ट्रीय खेळाडू सिकंदर बख्त म्हणाले, इम्रान खान यांनी तयार केलेले संघ मॉडेल आता दिसत नाही.Mohsin Naqvi
पहलगाम पीडितांना मानधन देण्याची घोषणा सूर्यकुमारने आशिया कपच्या सर्व सामन्यांचे मानधन भारतीय सैन्य व पहलगाम पीडितांना दान करण्याची घोषणा केली. एका सामन्याचे मानधन ४ लाख रु. असते.
पाकचा कर्णधार आगाने ऑपरेशन सिंदूरमध्ये मारल्या गेलेल्यांना मॅचच्या मानधनाची घोषणा केली.
दुबई | टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला आहे की देशाचा नेता आघाडीवर फलंदाजी करतो तेव्हा चांगले वाटते. जणू ते स्वतः स्ट्राइक घेत आहेत आणि धावा काढत आहेत. हे पाहून खूप आनंद झाला. सर समोर उभे असतात तेव्हा खेळाडू नक्कीच मोकळेपणाने खेळतील. रविवारी भारताच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली होती की – ऑपरेशन सिंदूर मैदानावर सुरूच आहे. निकाल एकच आहे, भारत जिंकला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App