विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारताने पाकिस्तानातल्या दहशतवादाविरुद्ध operation sindoor कारवाई मधून केलेल्या सगळ्या हल्ल्यांचे खोटे रिपोर्टिंग केल्याबद्दल चिनी सरकारी माध्यमे Xinhua आणि Global Times यांच्यावर आज भारताने बंदी घातली. पाकिस्तानी माध्यमांवर आधीच बंदी घालून भारत आणि पाकिस्तानला दणका दिला त्या पाठोपाठ पाकिस्तानची तळी उचलून धरणाऱ्या चिनी सरकारी माध्यमांना देखील भारताने आज दणका दिला.
Global Times ऑपरेशन सिंदूरच्या विपर्यस्त बातम्या दिल्याचे भारताच्या लक्षात आले होते त्या संदर्भात परराष्ट्र मंत्रालयाने Global Times तशी स्पष्ट नोटीस देखील दिली होती. परंतु त्या माध्यमाचे खोटे रिपोर्टिंग थांबले नाही. पाकिस्तानची तळी उचलून धरण्याचे प्रकार त्या माध्यमाने थांबविले नाहीत म्हणून भारताने Global Times च्या x हँडलवर बंदी घातली.
त्याचबरोबर चिनी सरकारी वृत्तसंस्था Xinhua ने देखील पाकिस्तानी चालवला होता. त्या वृत्तसंस्थेवर देखील भारताने बंदी घालून चीनला दणका दिला.
“ऑपरेशन सिंदूर” सुरू होण्याच्या काही दिवस आधी चीनने अरुणाचल प्रदेशातल्या काही गावांना आणि विभागांना चिनी नावे दिली होती. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने आज त्याचा तीव्र शब्दांमध्ये निषेध करून अरुणाचल प्रदेश हडपण्याच्या चीनच्या प्रयत्नांना भारत हाणून पाडेल, अशा स्पष्ट शब्दांत परराष्ट्र मंत्रालयाने भारताची भूमिका मांडली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App