वृत्तसंस्था
बीजिंग : चीनमधून उदयास आलेल्या कोरोना विषाणूचा जग सामना करत आहे. त्या चीनमध्ये बर्ड फ्लूच्या स्ट्रेनमुळे (H10N3) मानवी संसर्गाची पहिली घटना समोर आली आहे. तेथील नॅशलन हेल्थ कमिशनने याची पुष्टी केली. One infected with H10N3 bird flu in China; The first case of human infection in the world संक्रमित 41 वर्षीय व्यक्ती झेनजियांग शहरातील रहिवासी आहे. 28 मे रोजी बर्ड फ्लूचा स्ट्रेन या रूग्णात आढळला. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येईल. सध्या आरोग्य अधिकाऱ्यांनी संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्याचा शोध सुरू केला आहे.
संसर्गाची पहिलीच घटना
पोल्ट्रीमधून मानवामध्ये विषाणूचे संक्रमण होण्याची ही तुरळक घटना आहे. यातून साथीचा रोग होण्याचा धोका अत्यंत कमी आहे. नॅशनल हेल्थ कमिशनने, मात्र या व्यक्तील या स्ट्रेनची लागण कशी झाली ? याची माहिती दिली नाही. बर्ड फ्लू एक व्हायरल इन्फेक्शन आहे, ज्यास एव्हियन इन्फ्लूएन्झा देखील म्हणतात. त्याचे बर्याच प्रकारचे स्ट्रेन असतात. राष्ट्रीय आरोग्य आयोगाने म्हटले की या स्ट्रेनमधून मानवी संसर्गाची कोणतीही घटना यापूर्वी जगभरात नोंदली नव्हती. यातून साथीचा रोग होण्याची शक्यता कमी आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App