दुर्मीळ जीवाणू संसर्गावर ५४ दिवसांनंतर मात करीत त्याने मृत्यूला परतावले

विशेष प्रतिनिधी

दुबई – तब्बल ५४ दिवस दुर्मीळ व प्राणघातक जीवाणू संसर्गाशी झुंज देत अनिवासी भारतीयाने अखेरीस मृत्यूला हरविले. नीलेश सदानंद मडगावकर असे या ४२ वर्षीय अनिवासी भारतीयाचे नाव आहे. तो मूळचा गोव्याचा असून चालक आहे.NRI hits back dangerous virus

त्यांना सेपेशिया सिंड्रोम हा दुर्मीळ जीवाणू संसर्ग झाला होता. सुमारे ७५ टक्के मृत्यूदर असलेल्या या संसर्गातून ते आश्चर्यकारकरीत्या बचावले, असे डॉक्टरांनी सांगितले.नीलेश मडगावकर गेल्या २७ वर्षांपासून संयुक्त अरब अमिरातीत राहतात.



सुटीनंतर ते ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात अबू धाबीला परतले होते. त्यांना ताप व थकवा जाणवू लागला. दोनच दिवसांत त्यांची प्रकृती खालावली. त्यानंतर, त्यांच्या मालकाने त्यांना रुग्णालयात दाखल केले. तिथे त्यांना न्यूमोनियाचे निदान झाले.

श्वसनाला त्रास होत असल्याने त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले. मात्र, शरीराच्या विविध अवयवांवर गळू निर्माण होऊन व डाव्या गुडघ्यात स्राव सुरू झाल्याने त्यांची प्रकृती आणखी ढासळली.

त्यानंतर आणखी चाचण्या केल्यानंतर नीलेश यांच्या शरीरात बर्खोल्डेरिया सेपेशिया या जीवाणू आढळला. त्यांना सेपेशिया सिंड्रोम हा दुर्मीळ जीवाणू संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर अतिदक्षता विभागात उपचार सुरू झाले.

डॉ. नियास खलिद यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय पथकाने प्रतिजैवकांच्या सोबत बुरशीनाशक औषधे, स्टेरॉईड्‌स दिले. तब्बल एक महिन्यांच्या उपचारानंतर नीलेश यांची प्रकृती सुधारली. या जीवाणू संसर्गाला त्यांनी ५४ दिवसांच्या अथक लढाईनंतर हरविले.

NRI hits back dangerous virus

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात