North Korea : उत्तर कोरियाने जपानच्या दिशेने बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली; टोकियोचा आणीबाणीचा इशारा जारी

North Korea

वृत्तसंस्था

टोकियो : North Korea  उत्तर कोरियाने रविवारी जपानच्या परिसरात बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. जपानच्या पंतप्रधान कार्यालयाने याबाबत तातडीचा अलर्ट जारी केला.North Korea

स्थानिक वृत्तसंस्था ‘द जपान टाइम्स’ने संरक्षण मंत्री शिंजिरो कोइजुमी यांच्या निवेदनानुसार सांगितले की, उत्तर कोरियाने किमान दोन क्षेपणास्त्रे डागली आहेत.North Korea

अहवालानुसार, ही दोन्ही क्षेपणास्त्रे जपानच्या विशेष आर्थिक क्षेत्राबाहेर (EEZ) पडली. जपानचे हे विशेष आर्थिक क्षेत्र त्याच्या किनाऱ्यापासून 200 नॉटिकल मैल म्हणजेच सुमारे 370 किलोमीटरपर्यंत पसरलेले आहे आणि क्षेपणास्त्रे जपानच्या समुद्रात पडली.North Korea



 

याच अहवालात संरक्षण मंत्री कोइजुमी यांच्या हवाल्याने पुढे म्हटले आहे की, “उत्तर कोरियाकडून वारंवार केल्या जाणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रक्षेपणासारख्या कृती आमच्या प्रदेशासाठी आणि आंतरराष्ट्रीय समुदायाच्या शांतता व सुरक्षेसाठी धोकादायक आहेत.”

अधिकाऱ्याने असाही दावा केला की, क्षेपणास्त्रांनी सुमारे 950 किलोमीटरचे अंतर कापले. याचा अर्थ असा की, दक्षिण जपानचा मोठा भाग त्यांच्या मारक क्षमतेत येतो, ज्यात अमेरिका आणि जपानच्या सेल्फ-डिफेन्स फोर्सेसचे महत्त्वाचे लष्करी तळ देखील समाविष्ट आहेत.

North Korea Fires Ballistic Missiles Towards Japan Tokyo Issues Emergency Alert PHOTOS VIDEOS

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात