उत्तर कोरियात आत्महत्येवर बंदी, हुकूमशहा किमच्या मते हा देशद्रोह; गरिबी-उपासमार आत्महत्यांमध्ये 40% वाढ

वृत्तसंस्था

प्योंगयांग : उत्तर कोरियात आत्महत्येच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. हे पाहता हुकूमशहा किम जोंग उन यांनी आत्महत्येवर बंदी घालणारा गुप्त आदेश जारी केला आहे. याला त्यांनी देशद्रोह म्हटले आहे. आदेशात आत्महत्या रोखण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांवर टाकण्यात आली आहे. संपूर्ण उत्तर कोरियामध्ये देशद्रोहाचे कोणतेही प्रकरण उघडकीस आले, तर त्यासाठी अधिकारी जबाबदार असतील.North Korea Bans Suicide, Says Dictator Kim Is Treason; 40% increase in poverty-hunger suicides

उत्तर कोरियाच्या एका अधिकाऱ्याने रेडिओ फ्री एशियाशी बोलताना ही माहिती दिली. दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थेच्या म्हणण्यानुसार, उत्तर कोरियामध्ये गतवर्षीच्या तुलनेत मे महिन्यापर्यंत 40% अधिक आत्महत्या झाल्या आहेत. या वर्षी चोंगजिन प्रांतात आत्महत्येच्या 35 घटना घडल्या आहेत. यातील बहुतांश घटना संपूर्ण कुटुंबाने एकत्र आत्महत्या केल्याच्या आहेत. सुसाइड नोटमध्ये लोकांनी तेथील समाजव्यवस्थेवर टीका केली आहे. वाढती गरिबी आणि बेरोजगारी हे आत्महत्येचे कारण असल्याचे त्यांनी सांगितले.



उत्तर कोरियात हिंसक गुन्ह्यांत वाढ

WHOच्या 2019च्या अहवालानुसार, उत्तर कोरियामध्ये प्रत्येक 1,00,000 लोकांमागे 8.2 आत्महत्या झाल्या आहेत. मात्र, किम यांनी आत्महत्या प्रकरणाची अधिकृत आकडेवारी अद्याप जाहीर केलेली नाही. दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थेने सांगितले की, किम यांच्या देशात हिंसक गुन्ह्यांच्या घटनांमध्येही सातत्याने वाढ होत आहे.

रेडिओ फ्री एशियाच्या वृत्तानुसार, आत्महत्येच्या वाढत्या प्रकरणावर हुकूमशहा किम यांनी तातडीची बैठक बोलावली होती. यामध्ये देश आणि समाजव्यवस्थेवर टीका करणाऱ्या सुसाइड नोटचा खुलासा झाल्याने लोकांना धक्का बसला आहे.

किमच्या राजवटीत हॉलिवूड चित्रपट-मालिका पाहिल्याबद्दल मुले आणि पालकांना शिक्षा

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम त्याच्या बेताल निर्णयांसाठी ओळखला जातो. काही महिन्यांपूर्वी हुकूमशहाने येथे हॉलिवूड चित्रपट किंवा मालिका पाहणाऱ्या मुलांसाठी शिक्षा अधिक कठोर केली. जर एखाद्या मुलाने आदेशाचे पालन केले नाही तर त्याच्या पालकांनाही शिक्षा होईल, अशी तरतूद केली.

North Korea Bans Suicide, Says Dictator Kim Is Treason; 40% increase in poverty-hunger suicides

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात