नोबेल शांतता पुरस्काराची अमेरिकेच्या उतावळ्याला हुलकावणी; त्याच्या ऐवजी व्हेनेझुएलाच्या महिला कार्यकर्तीने घातली पुरस्काराला गवसणी!!

नाशिक : नोबेल शांतता पुरस्काराची अमेरिकेच्या उतावळ्याला हुलकावणी; त्याच्या ऐवजी व्हेनेझुएलाच्या महिला कार्यकर्तीने घातली पुरस्काराला गवसणी!!, असे आज घडले. आपल्याला शांततेचा नोबेल पुरस्कार मिळावा यासाठी जंग जंग पछाडणाऱ्या उतावळ्याला अखेर नोबेल शांतता पुरस्कार मिळालाच नाही. त्या उतावळ्याच्या ऐवजी व्हेनेझुएलाच्या महिला कार्यकर्त्या मारिया कोरिना मचाडो यांना नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला. व्हेनेझुएला मध्ये लोकशाही मूल्ये रुजविण्यासाठी तिथल्या एकाधिकारशाही सरकार विरुद्ध यशस्वी संघर्ष करण्यासाठी मरिया कोरिना मचाडो यांनी प्रचंड कार्य उभे केले. त्यांच्या या कार्याबद्दल नोबेल पुरस्कार समितीने त्यांची नोबेल शांतता पुरस्कारासाठी निवड केली. तशी घोषणा आज झाली. नोबेल समितीने 50 वर्षांच्या परंपरेनुसार सर्व राष्ट्रांनी केलेल्या शिफारशी गुप्त ठेवल्या. Nobel Peace

– सगळ्यांच्या शिफारसीचे मुसळ केरात 

नोबेल शांतता पुरस्कार जाहीर होण्यापूर्वी अमेरिकेच्या उतावळ्याने त्यासाठी जंग जंग पछाडले. संजय राऊतांसारख्या दररोज पत्रकार परिषदा घेतल्या‌. जगातली सगळी युद्धे मीच थांबविली. सगळ्या युद्धखोर राष्ट्रांना मीच “सरळ” केले. त्यामुळे मीच नोबेल शांतता पुरस्काराचा “खरा मानकरी” आहे, असा दावा अमेरिकेच्या उतावळ्याने सारखा मांडला होता. पाकिस्तानने सुद्धा त्या उतावळ्याची नोबेल पुरस्कारासाठी शिफारस केली होती. नोबेल शांतता पुरस्कार जाहीर होण्यापूर्वी तर रशियाने सुद्धा अमेरिकेच्या उतावळ्याचा दावा मान्य करून त्याला पाठिंबा दिला होता.

रशियाबरोबरच युद्ध खरंच थांबले तर युक्रेन सुद्धा अमेरिकेच्या उतावळ्याला नोबेल पुरस्कारासाठी पाठिंबा देईल, असे युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी जाहीर केले होते. काल तर या सर्वांच्यावर कळस चढवून इजराइलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (AI) वापर करून अमेरिकेच्या उतावळ्याच्या गळ्यात नोबेल पुरस्काराचे पदक घातले होते. परंतु अखेरपर्यंत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या उतावळ्यासाठी नोबेल पुरस्काराची शिफारस भारतातर्फे केली नव्हती.

अखेर नोबेल समितीने आज शांतता पुरस्कार जाहीर केला. त्यामध्ये अमेरिकेच्या उतावळ्याचे नाव नव्हते. अमेरिकेच्या उतावळ्याला पुरस्काराने हुलकावणी दिली होती. त्याच्या ऐवजी व्हेनेझुएलाच्या महिला कार्यकर्त्या मारिया कोरिना मचाडो यांच्या गळ्यात नोबेल पुरस्काराचे पदक घालायचा निर्णय नोबेल समितीने जाहीर केला. त्यामुळे अमेरिकेच्या उतावळ्याचा पापड पुरता मोडला.

Nobel Peace Prize 2025 goes to Maria Corina Machado

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात