Imran Khan Arrest : माझी अटक हा ‘London plan’चा भाग – इम्रान खान यांचा मोठा दावा!

शहबाज सरकारवर त्यांच्या अटकेची योजना आखल्याचा आरोप!

विशेष प्रतिनिधी

लाहोर : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे (पीटीआय) अध्यक्ष इम्रान खान यांनी आपल्या अटकेबाबत मोठा दावा केला आहे. देशाचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यावरील सर्व खटले संपवण्याच्या ‘लंडन योजनेचा’ हा एक भाग असल्याचे सांगून त्यांनी शहबाज सरकारवर त्यांच्या अटकेची योजना आखल्याचा आरोप केला आहे. My arrest part of London plan Imran Khan

एका व्हिडिओ संदेशात इम्रान खान यांनी म्हटले आहे की, “हा लंडनच्या योजनेचा एक भाग आहे आणि इम्रान खानला तुरुंगात टाकण्यासाठी, पीटीआयला खाली आणण्यासाठी व नवाझ शरीफ यांच्यावरील सर्व खटले मागे टाकण्यासाठी तेथे एक करार करण्यात आला आहे.”


टेन्शन वाढलं! : रशियन विमानांनी पाडले अमेरिकी ड्रोन, अमेरिकेने दिला कठोर इशारा


सध्या लाहोरमध्ये तणावाचे वातावरण असताना इम्रान खान यांचे हे खळबळजनक वक्तव्य समोर आले आहे. काल इम्रान खान यांच्या निवासस्थानी जमान पार्क येथे अटक करण्यासाठी पोलीस आले होते, जिथे त्यांच्या अटकेवरून पक्ष कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये १४ तासांहून अधिक काळ संघर्ष सुरू होता.

पोलिसांनी जमान पार्कच्या बाहेर समर्थकांवर अश्रुधुर आणि पाण्याच्या मारा केल्यानंतर इम्रानने आपल्या समर्थकांना बाहेर पडण्याचे आवाहन केले, ज्यामुळे इस्लामाबाद, पेशावर आणि कराचीमध्ये निदर्शने झाली.  दुसरीकडे, पेशावरमधील प्रेस क्लबबाहेरही मोठ्या संख्येने पीटीआय समर्थकांनी निदर्शने केली.

My arrest part of London plan Imran Khan

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात