या भीषण स्फोटात एकाचा मृत्यू झाला आहे तर सात जण जखमी झाले आहेत.
विशेष प्रतिनिधी
न्यू ऑर्लिन्स : अमेरिकेत पुन्हा एकदा एक दुर्घटना घडली आहे. आधी न्यू ऑर्लिन्समध्ये एका माथेफिरूने अनेकांना ट्रकने चिरडले आणि आता लास वेगासमध्ये स्फोट झाला आहे. ट्रम्प टॉवरच्या बाहेर हा स्फोट झाला. टेस्ला कंपनीच्या सायबर ट्रकमध्ये हा स्फोट झाला.
एफआयबी याचा एखाद्या दहशतवादी घटनेप्रमाणे तपास करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लास वेगासमधील ट्रम्प इंटरनॅशनल हॉटेलच्या बाहेर टेस्ला सायबर ट्रक उभा होता. ज्यात स्फोट झाला. या स्फोटात चालकाचा मृत्यू झाला. तर सातजण जखमी झाले आहेत. एफबीआय या प्रकरणाचा दहशतवादी घटना म्हणून तपास करत आहे.
Sharad Pawar : गुरुने दिला शरणागतीचा वसा; चला पुतण्याच्या सत्तेच्या वळचणीला जाऊन बसा!!
हे लक्षात घेण्यासारखे आहे की ट्रम्प इंटरनॅशनल हॉटेलचे मालक अमेरिकेचे नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आहेत, तर टेस्लाचे मालक एलोन मस्क आहेत. इलॉन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प हे खास मित्र आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सायबर ट्रकचा स्फोट कसा झाला हे व्हिडिओमध्ये दिसत आहे. सायबर ट्रक जळून खाक झाला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App